Arunachal Pradesh  sakal
देश

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशात पावसाने हाहाकार;राज्यातील ४४ पेक्षा अधिक गावांना पुराचा फटका

सकाळ वृत्तसेवा

इटानगर : अरुणाचल प्रदेशात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील सर्व नद्या दुथडीभरून वाहत असून त्यांनी धोक्याची रेषा ओलांडली असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

पूर्व कामेंग जिल्ह्यातील सेप्पा या गावातील अनेक घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. मात्र यात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे प्रशासनाने सांगितले. राज्याची राजधानी इटानगर येथील विभाग सहामध्ये झालेल्या भूस्खलनाने अनेक इमारती आणि नागरिकांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे रविवारी येथील कुरुंग पूलही वाहून गेल्याने कुरुंग कुमे जिल्ह्याचा संपर्क तुटल्याचे कोलोरिआंगचे आमदार पानी ताराम यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील नामसाई जिल्हा आणि लोहित जिल्ह्यातील वाक्रो मंडलाला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील मिळून ४४ गावांना पुराचा फटका बसला आहे.

पूर्व सिंयांग जिल्ह्यातील सियांग नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाणी पातळीत मुसळधार पावसामुळे वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे पासीघाट-यिंगकिओंग आणि पासीघाट-आलो या महामार्गांवर भूस्खलनामुळे वाहतूक विस्कळित झाली आहे. पूर्व सियांग जिल्ह्यातील पासीघाट, रुकसीन, मिरेम आणि बिलात येथील सखल भागातही पुराचे पाणी आले आहे.

रेल्वेमार्गाच्या कामावरही परिणाम

अरुणाचल प्रदेशातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुरुकोंगसेलेक-पासीघाट या रेल्वेच्या मार्गाच्या कामावरही मुसळधार पावसाचा परिणाम होत असून या मार्गाच्या बांधकामात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. दरम्यान अरुणाचलमधील चांगलांग, नामसाई, लोहित यांसह काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामानखात्याने वर्तविला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT