एका मूकबधिर मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आलीय.
राजस्थानमधील उदयपूरमध्ये (Udaipur Rajasthan) एका मूकबधिर मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आलीय. यादरम्यान ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचंही सांगितलं जात आहे.
हिरणचे एसएचओ रामसुमरे मीना यांनी सांगितलं की, 21 ऑक्टोबर रोजी काही लोकांनी एक मूकबधिर मुलगी विवस्त्र अवस्थेत फिरताना पाहिली, त्यानंतर तिला सुखेर येथील 'आश्रयस्थळी' पाठवण्यात आलं. मुलगी दुसऱ्या दिवशी भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या पायाला दुखापत झाली, त्यानंतर तिला एमबी हॉस्पिटलमध्ये (MB Hospital) आणण्यात आलं. एसएचओच्या म्हणण्यानुसार, हॉस्पिटलमध्ये तपासणीदरम्यान ती चार ते पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं आढळून आलं.
तपासादरम्यान मूकबधिर महिलेची गर्भधारणा झाल्याचं गुरुवारी समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याचवेळी महिलेनं एका भाषा तज्ञाच्या मदतीनं आपल्यावर काही लोकांनी बलात्कार केल्याचंही सांगितलं. त्यानंतर 23 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीनं तीन लोकांना ओळखलं असून तेही मूकबधिर आहेत. पोलीस डीएनए आणि अन्य प्रकारचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या मुलीला वडील नाहीत, तर आई घरकाम करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.