किरोरी बैंसला हे भारतीय सैन्यात कर्नल म्हणूनही कार्यरत होते.
राजस्थानचे (Rajasthan) गुर्जर नेते किरोरी सिंह बैंसला (Gurjar Leader Kirori Singh Bainsla) यांचं आज निधन झालंय. बैंसला हे अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू होते. किरोरी बैंसला राजस्थानातील गुज्जर चळवळीचा (Rajasthan Gurjar Movement) मोठा चेहरा मानले जातात. मात्र, नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
किरोरी बैंसला हे भारतीय सैन्यात कर्नल (Indian Army) म्हणूनही कार्यरत होते. 2007 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानमध्ये गुज्जरांचं मोठं आंदोलन झालं. राजस्थानमधील गुज्जरांना आरक्षण मिळावं, यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. ते गुर्जर आरक्षण संघर्ष समितीचे प्रमुख होते.
सामाजिक हक्कांसाठी किरोरींनी आयुष्यभर संघर्ष केला : ओम बिर्ला
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी कर्नल किरोरी सिंह बैंसला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. ते म्हणाले, 'बैंसला हे सामाजिक चळवळीचे खंबीर नेते होते. सामाजिक हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केलाय. त्यांची उणीव नेहमीच जाणवेल.'
किरोरीलाल दीर्घकाळ आजारी होते. त्यामुळं त्यांचा मुलगा विजय बैंसला गुर्जर आरक्षण संघर्ष समितीचा (Gurjar Reservation Struggle Committee) प्रमुख बनला. किरोरीलाल यांनाही कोरोना काळात दोनदा संसर्ग झाला होता. दरम्यान, 2007 मध्ये बैंसला यांच्या नेतृत्वाखाली गुज्जरांचं मोठं आंदोलन झालं. यानंतर 2015 मध्येही त्यांच्या नेतृत्वाखाली मोठं गुर्जर आंदोलन करण्यात आलं. 25 दिवसांच्या आंदोलनानंतर बैंसला यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांच्यासोबत गुर्जर समाजाची बैठक झाली. यामध्ये गुज्जरांना 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.