Jodhpur Fire News esakal
देश

Jodhpur Blast: गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट, होरपळून चौघांचा मृत्यू

राजस्थानच्या जोधपूर येथील घटना

सकाळ डिजिटल टीम

जोधपूरः महाराष्ट्रात दिवसभरात आगीच्या पाच घटना घडलेल्या आहेत. राजस्थानमधूनही एक मोठी बातमी पुढे येतेय. राजस्थानच्या जोधपूर येथे सिलेंडरमध्ये गॅस भरतांना मोठा स्फोट झाला. यामध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

जोधपूर शहरामध्ये आज (शनिवारी) ही घटना घडली. स्फोट एवढा भीषण होता की, तीन लहान मुले आणि आणखी एक इसम अशा चौघांचा होरपळून मृत्यू झाला. तर १६ जण गंभीररित्या भाजले आहेत. स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरुन गेला होता. जवळपास उभ्या असलेल्या गाड्यांनाही यावेळी आग लागली. जिल्हाधिकारी हिमांशु गुप्तांनी सांगितल्याप्रमाणे दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला.

निकू (वय १२), विक्की (१५), कोमल (१३) आणि सुरेश (४५) अशी मृतांची नावे आहेत. तर १६ जण यामध्ये गंभीर जखमी झालेले असून ८ जण ८० टक्के भाजले आहेत. ज्या घरात गॅस रीफिलिंग होत होती, ते घर कोजाराम लोहार नामक व्यक्तीचं आहे. कोजारामचा मुलगा गॅस भरण्याचं काम करतो. रीफिलिंगचं काम सुरु असतानाच हा स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

यासंदर्भात मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करुन संवेदना व्यक्त केल्या. तपासामध्ये घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर सिलेंडर आढळून आलेले आहेत. आमदार मनिषा पवार यांनी या प्रकरणी सांगितले की, मुख्यमंत्री कार्यालयातून या प्रकरणावर लक्ष ठेवलं जात आहे. शहरात अवैध गॅस भरण्याचं काम केलं जातंय. त्याचाही तपास केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT