Rajasthan Train Derailed Esakal
देश

Rajasthan Train Derailed: मोठा अनर्थ टळला! अजमेरमध्ये साबरमती एक्सप्रेस आणि मालगाडीमध्ये भीषण धडक, ४ डब्बे रूळावरून घसरले

Sabarmati-Agra Cantt Express accident news: राजस्थानमधील अजमेर येथे साबरमती एक्सप्रेस आणि एका मालगाडीमध्ये भीषण धडक झाली आहे. या भीषण घटनेनंतर साबरमती एक्सप्रेस ही रूळावरून खाली घसरली.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Sabarmati-Agra Cantt Express accident: राजस्थानमधील अजमेर येथे साबरमती एक्सप्रेस आणि एका मालगाडीमध्ये भीषण धडक झाली आहे. या भीषण घटनेनंतर साबरमती एक्सप्रेस ही रूळावरून खाली घसरली. मिळालेल्या माहितीनुसार एकाच रेल्वे रूळावरून दोन्ही रेल्वे आल्याने ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घसरलेल्या रेल्वेच्या डब्यातून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आले.

हा अपघात एवढा भीषण होता की, साबरमती आग्रा केंट सुपर फास्ट एक्स्प्रेसच्या इंजिनसह 4 डबे रुळावरून खाली घसरले. मदार स्टेशनजवळ रात्री 1.10 च्या सुमारास मालगाडी आणि एक्स्प्रेस एकाच रुळावर आल्याने हा अपघात झाला.

यानंतर ट्रेनच्या लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावला मात्र साबरमती एक्स्प्रेस मालगाडीला धडकली.अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये हजारो प्रवासी प्रवास करत होते. रुळावरून घसरल्यानंतर ट्रेन रुळावरून घसरली त्याचबरोबर विजेच्या खांबालाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

रात्री उशिरा हा अपघात झाला

या घटनेनंतर प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अजमेर रेल्वे स्थानकातून रात्री 12:55 च्या सुमारास निघाली आणि काही किलोमीटर प्रवास केल्यानंतर हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये बसलेल्या लोकांना जबर धक्का बसला आणि सीटवर झोपलेली मुले, महिला आणि वृद्ध लोक सीटवरून खाली पडले. अपघातानंतर रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने प्रवाशांनीही नाराजी व्यक्त केली.

अपघातानंतर प्रवासी पायी शहराकडे रवाना झाले. यानंतर ट्रेनजवळ उपस्थित असलेल्या प्रवाशांना दुपारी 3.16 च्या सुमारास ट्रेनच्या सुरक्षित डब्यात बसवून अजमेर जंक्शनला पाठवण्यात आले.

अपघाताच्या कारणांचा शोध सुरू असल्याचे घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वे ट्रॅक व्यवस्थित करण्याचे काम सुरू आहे. एडीआरएम बलदेव राम यांनी सांगितले की, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Cha.Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT