Rajiv Gandhi fled during 1971 war with Pakistan bjp counter Rahul Gandhi's Ukraine questions  Team eSakal
देश

राहुल गांधींच्या प्रश्नावर भाजप म्हणतं, 'राजीव गांधी 1971 च्या युद्धात…'

सकाळ डिजिटल टीम

रशिया-युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) सुरु असलेल्या युध्दात हजारो विद्यार्थी अडकले आहेत, या दरम्यान सरकराकडून विद्यार्थ्यांना परत घेऊन येण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नांबाबत सरकारला प्रश्न विचारले. त्यावर भाजप (BJP) चे अमित मालवीय यांनी राहुल गांधींवर हल्ला चढवला आहे. त्यांनी राहिल गांधी यांचे वडील 1971 च्या पाकिस्तानशी युद्धाच्या वेळी रजेवर गेले होते, असे म्हटले आहे.

"भारताने जितके प्रमाण युक्रेनमध्ये काढले आहे त्या प्रमाणात कोणत्याही देशाने बाहेर काढले नाही. तरीही, राहुल गांधी, ज्यांचे वडील, एक AI पायलट, 1971 च्या पाकबरोबरच्या युद्धादरम्यान रजेवर गेले होते, त्यानंतर 1977 मध्ये, इंदिराजींनी सत्ता गमावली तेव्हा कुटुंब इटालियन दूतावासात लपले होते , ते भारतीयांच्या सुरक्षेवर आम्हाला प्रश्न विचारत आहेत!, असे ट्विट मालवीय यांनी केले आहे

राजीव गांधींबाबतचा हा दावा नवीन नाहीये आणि तो सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर सतत फॉरवर्ड केला जातो. मात्र हा दावा नेहमीच विवादित राहिला आहे कारण अनेक इतिहासकारांनी असा दावा केला आहे की, 1971 च्या युद्धात राजीव गांधींची कोणतीही भूमिका नव्हती.

युक्रेनमध्ये अनेक भारतीय अडकून मानवतावादी संकटाचा सामना करत असताना, राहुल गांधी यांनी बुधवारी सरकारला किती विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले आहे आणि किती अजूनही युक्रेनमध्ये अडकले आहेत याबाबत प्रश्न केले होते आणि केंद्राने आपली रणनीती त्यांच्या कुटुंबियाना स्पष्ट करावी अशी मागणी केली.

युक्रेनमधील विद्यार्थ्यांचे व्हिडिओ शेअर करत राहुल आणि प्रियांका गांधी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. युक्रेनमधून सर्व भारतीय विद्यार्थ्यांना लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी काँग्रेसने सोशल मीडियावर "SpeakUpForStudents" मोहीम सुरू केली आहे.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, "भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतरही नरेंद्र मोदी सरकार झोपलेले पाहणे खरोखरच निराशाजनक आहे! काही दिवसांपूर्वीच तातडीने पावले उचलायला हवी होती, परंतु आमचे पंतप्रधान आणि त्यांचे मंत्री "आपदा में अवसर" शोधण्यात व्यस्त होते आणि युद्धाच्या संकटाच्या मध्येही त्यांची पिआर मोहीम चालवत आहेत!"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT