Rajkot Airport 
देश

Rajkot Airport Incident: दिल्लीनंतर आता गुजरातच्या विमानतळावर देखील सारखीच घटना; मुसळधार पावसामुळे छत कोसळले

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- मुसळधार पावसामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे छत शुक्रवारी कोसळले होते. यात एकाचा मृत्यू झाला होता. शनिवारी अशाच प्रकारचा अपघात घडला आहे. गुजरातच्या राजकोट विमानतळाचे छताचा एक भाग कोसळून खाली पडला आहे. पीटीआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

मुसळधार पावसामुळे विमानतळ टर्मिनलच्या बाहेरील पॅसेंजर पिकअप आणि ड्रॉप भागातील छताचा भाग कोसळला. जुलै २०२३ मध्ये याचे लोकार्पण झाले होते. सुदैवाने अपघातावेळी याठिकाणी कोणी उपस्थित नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दिल्लीमध्ये घटनेत एका कॅब ड्रायव्हरचा मृत्यू झाला होता आणि काहीजण जखमी झाले होते.

दिल्ली विमानतळावर काय झालं होतं?

दिल्ली विमानतळावर टर्मिनल-१ वर छत कोसळले होते. यात सहा जण जखमी झाले होते. एका कॅब ड्रायव्हरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या अपघातानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने शुक्रवारी सर्व विमानतळांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा आदेश दिला आहे. पुढील चार ते पाच दिवसांत निरीक्षण पूर्ण करून अहवाल मंत्रालयाला पाठवायचा आहे. दिल्लीतील शुक्रवारच्या घटनेने काही प्रमाणात विमान सेवेवर परिमाण झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'प्रकाश आंबेडकरांची राज्यात एखादी तरी जागा निवडून आली असती, तर आम्ही त्याची दखल घेतली असती' - शरद पवार

Mumbai Crime: CSMT स्टेशन येथे सामूहिक बलात्कार झालेली 29 वर्षीय महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरु

Latest Marathi News Live Updates : राहुल गांधी कौल्हापूरमध्ये दाखल

Morning Routine: दिवसभर स्ट्रेस फ्री राहण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर करा 'या' गोष्टी, दिवसभर राहाल उत्साही

Bigg Boss 18 House: मातीच्या वस्तू अन् दगडाच्या खुर्च्या; कसं आहे सलमानच्या बिग बॉस १८ चं घर? पाहा inside video

SCROLL FOR NEXT