Rajya Sabha Election esakal
देश

Rajya Sabha Election: राज्यसभेत बिघडणार इंडिया आघाडीचा खेळ! पोटनिवडणुकीत एनडीएचा विजय पक्का, जाणून घ्या समीरण

Sandip Kapde

लोकसभा निवडणुकीत संपल्यानंतर आता राज्यसभा पोटनिवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यसभा सचिवालयाने १० जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली होती. या निवडणुकीनंतर एनडीएस सरकार आणखी मजबूत होणार आहे. तर इंडिया आघाडीची ताकद कमी होणार आहे.

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत सर्व जागा भाजप-एनडीए आघाडीच्या वाट्याला जाणार आहेत. याचे कारण म्हणजे ज्या राज्यांमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत, तेथे सध्या भाजप-एनडीएचे सरकार आहे. त्यामुळे काँग्रेसला राज्यसभेच्या दोन जागा गमवाव्या लागतील.

काँग्रेसचे दोन राज्यसभा खासदार केसी वेणुगोपाल आणि दीपेंद्र हुडा यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. वेणुगोपाल हे राजस्थानचे राज्यसभेचे खासदार आहेत, तर हुड्डा हे हरियाणातून वरच्या सभागृहाचे सदस्य आहेत. सध्या हरियाणा आणि राजस्थानमध्ये भाजपचे बहुमत आहे.

राज्यसभेच्या रिक्त झालेल्या 10 जागांपैकी 7 जागा भाजपच्या ताब्यात आहेत. दोन जागा काँग्रेसकडे, तर एक जागा आरजेडीच्या खात्यात आहे. बिहार, महाराष्ट्र आणि आसाममधून प्रत्येकी दोन जागा तर राजस्थान, त्रिपुरा, हरियाणा आणि मध्य प्रदेशमधून प्रत्येकी एक जागा रिक्त आहे.

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीतही भाजप काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या दोन जागा जिंकणार आहे. काँग्रेसच्या दोन जागा हरियाणा आणि राजस्थानमधील आहेत, जिथे भाजप सध्या बहुमताने सत्तेत आहे.

तसेच बिहारमध्येही आता भाजपचे सरकार आहे. महाराष्ट्र आणि आसाम ही अशी दोन राज्ये आहेत, जिथे भाजप सध्या मित्रपक्षांसह सरकार चालवत आहे. मध्य प्रदेशात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार आहे. त्रिपुराबाबत बोलायचे झाले तर येथेही भाजपचे सरकार आहे. बिहारमधील दोन जागांपैकी एक जागा एनडीएला आणि एक जागा भारत आघाडीला दिली जाऊ शकते. तरीही भाजपला 10 पैकी 9 जागा जिंकण्याची संधी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT