Jagdeep Dhankhar 
देश

Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड यांचा 'आप'ला दिला दणका! अरविंद केजरीवालांची 'ती' विनंती नाकारली

दिल्ली दारू धोरण प्रकरणी आपचे राज्यसभा सदस्य संजय सिंह सध्या तुरुंगात आहेत. राज्यसभा सचिवालयातील सूत्रांनी पुष्टी केली की चड्ढा यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्याबाबत आपकडून पत्र प्राप्त झाले आहे.

Sandip Kapde

Jagdeep Dhankhar: राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आप'ला दणका दिला आहे. राघव चढ्ढा यांची संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्याची आपची विनंती जगदीप धनखड यांनी फेटाळून लावली आहे. संजय सिंह यांच्या जागी खासदार राघव चढ्ढा यांची राज्यसभेत पक्षनेता म्हणून नियुक्ती केली होती.

राज्यसभा अध्यक्षांना पक्षप्रमुख यांनी पत्र लिहिले होते. यामध्ये म्हटले होते की संजय सिंह यांच्या अनुपस्थितीत राघव चढ्ढा हे वरच्या सभागृहाचे पक्षनेता असतील, मात्र धनखड यांनी ही विनंती मान्य केली नाही. (Latest Marathi News)

दिल्ली दारू धोरण प्रकरणी आपचे राज्यसभा सदस्य संजय सिंह सध्या तुरुंगात आहेत. राज्यसभा सचिवालयातील सूत्रांनी पुष्टी केली की चड्ढा यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्याबाबत आपकडून पत्र प्राप्त झाले आहे. यावर पुढील कार्यवाही करण्यासाठी राज्यसभेच्या सरचिटणीस यांना पत्र पाठवले होते.

राघव चढ्ढा हे राज्यसभेच्या सर्वात तरुण सदस्यांपैकी एक असल्याची माहिती आहे.सध्या 'आप'चे वरिष्ठ सभागृहात एकूण 10 सदस्य आहेत. भाजप, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनंतर राज्यसभेतील सदस्यसंख्येच्या बाबतीत आप हा चौथा सर्वात मोठा पक्ष आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT