नवी दिल्ली- राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल करणे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांना महागात पडण्याची शक्यता आहे. कारण, त्यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
एका वकीलाने दिल्लीच्या डिफेंन्स कॉलनी पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल केलीये. त्यामुळे बॅनर्जी अडचणीत येण्याची शक्यता आहे. (Rajya Sabha Chairman jagdeep dhankhar video of MP mimicking him MP Kalyan Banerjee case registered)
संसदेतून आतापर्यंत १४१ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यापैकी कल्याण बॅनर्जी हे देखील आहेत. बॅनर्जी यांनी संसदेच्या बाहेर अनेक खासदार उपस्थित असताना त्यांच्यासमोर उपराष्ट्रपतींची नक्कल केली. यावेळी उपस्थित खासदार त्यांना दाद देत असल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे देखील तेथे होते आणि ते या सर्व प्रकाराचा व्हिडिओ शूट करत होते.
सदर प्रकरण दक्षिण जिल्हा पोलिसांच्या अंतर्गत येत नाही, त्यामुळे तक्रार नवी दिल्ली जिल्हा पोलीस स्टेशनमध्ये ट्रान्सफर करण्यात आली आहे. या घटनेनंतर जगदीप धनखड यांनी नाराजी व्यक्त केली होती. काही तरी मर्यादा असायला हवी. थोडी तरी लाज बाळगायला हवी होती. एक खासदार माझी नक्कल करतोय अन् दुसरा व्हिडिओ बनवतोय, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
संसदेत घुसखोरी केल्याप्रकरणात विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यांनी लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहात गदारोळ केला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला आणि राज्यसभा सभापती जयदीप धनखड यांनी प्रस्तावानुसार खासदारांवर निलंबनाची कारवाई केली. आतापर्यंत १४१ खासदारांचे निलंबन झालं आहे. अधिवेशनाला काही दिवस शिल्लक असताना विरोधी बाकांवर शुकशुकाट पाहायला मिळणार आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.