नवी दिल्ली- पुणे पोर्शे अपघात प्रकरण अद्याप ताजं आहे. त्यातच आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. एका हाय-प्रोफाईल व्यक्तीच्या मुलीने फुटपाथवर झोपलेल्यांना लोकांना चिरडलं आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे मुलीला जामीन देखील मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राज्यसभा खासदाराची मुलगी आहे. आरोपीसोबत एक तिची मैत्रिण देखील गाडीमध्ये होती. दाव्यानुसार, खासदाराच्या मुलीने मद्यधुंद अवस्थेमध्ये फुटपाथवर झोपलेल्या २४ वर्षीय पेंटर सूर्याला कारने चिरडलं आहे. आरोपी माथुरी घटनास्थळावरून पसार झाली. तर, तिची मैत्रिण कारमधून उतरली आणि ती गोळा झालेल्या लोकांशी हुज्जत घालत होती. त्यानंतर तिही तेथून निघून गेली.
सोमवारी रात्री चेन्नईमध्ये वायएसआर काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार बीडा मस्तान राव यांची मुलगी माधुरी BMW चालवत होती. चेन्नईच्या बसंत नगरमध्ये सूर्या फुटपाथवर झोपला होता. यावेळी आरोपी माधुरीने दारुच्या नशेत सूर्याच्या अंगावर BMW घातल्याचा आरोप आहे. आरोपी माधुरीला लगेच जामीन मिळाला असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
काही लोकांनी सूर्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पण, गंभीर जखमी झाला असल्याने त्याचा मृत्यू झाला. सूर्याचे ८ महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. घटनेची माहिती मिळताच सूर्याचे कुटुंबीय आणि इतर लोक शास्त्री नगर पोलीस स्टेशनजवळ गोळा झाले होते. आरोपी विरोधात कठोर कारवाईची त्यांनी मागणी केली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी सीसीटीव्ही तपासला. BMW खासदार बीडा मस्तान राव यांची असल्याचं पोलिसांना आढळून आलं. तसेच BMW ची नोंदणी पुद्दुचेरी येथे झालेली आहे. माधुरीला अटक झाली होती पण तिला जामीन मिळाला आहे. दरम्यान, राव हे २०२२ मध्ये राज्यसभा खासदार झाले आहेत. त्याआधी ते आमदार होते. त्यांचे मालकीच्या BMR ग्रुप सी-फूड इंडस्ट्रीमध्ये मोठे नाव आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.