Delhi Service Bill 2023 
देश

Delhi Service Bill 2023: केजरीवालांना मोठा झटका! 'दिल्ली सेवा विधेयक' राज्यसभेतही मंजूर

आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या सहीसाठी पाठवण्यात येणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

विरोधकांच्या प्रचंड गोंधळानंतर 'दिल्ली सेवा विधेयक' सोमवारी राज्यसभेतही मंजूर झालं. या विधेयकाच्या बाजूनं १३१ तर विरोधात १०२ मतं पडली. त्यानंतर हे विधेयक मंजूर झाल्याची घोषणा उपसभापतींनी केली. यावेळी सत्ताधारी खासदारांकडून 'मोदी-मोदी', 'भारत माता की जय' अशा घोषणा देण्यात आल्या. (Rajya Sabha passes Delhi Services Bill with Ayes 131 Noes 102)

राष्ट्रपतींकडं सहीसाठी जाणार

लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झालं आहे. त्यामुळं ते आता राष्ट्रपतींच्या सहीसाठी पाठवण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यावर सही केल्यानंतर त्याचं प्रत्यक्ष कायद्यात रुपांतर होईल. (Latest Marathi News)

विरोधकांचा प्रचंड गोंधळ

दरम्यान, राज्यसभेत या विधेयकावर चर्चा सुरु असताना आम आदमी पार्टीच्या खासदारांसह इतर विरोधक खासदारांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. हे विधेयक बेकायदा असल्याचं ते वारंवार सांगत होते. तसेच या विधेयकाच्या मंजुरीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी हे सुप्रीम कोर्टाचं देखील ऐकत नाहीत, असा आरोप केला. (Marathi Tajya Batmya)

अमित शहांचा 'आप'वर हल्लाबोल

यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी आपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी म्हटलं की, "काँग्रेसचा विरोध केल्यानंतर आम आदमी पार्टीचा जन्म झाला. काँग्रेसविरोधात जवळपास तीन टन आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्यानंतर हा पक्ष अस्तित्वात आला आणि आज आय विधेयकाला विरोध करण्यासाठी हा पक्ष आता काँग्रेसचं समर्थन मागत आहेत. जेव्हा हे विधेयक मंजूर होईल तेव्हा अरविंद केजरीवाल पलटतील, ठेंगा दाखवतील या व्यतिरिक्त काहीही होणार नाही"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT