Rajya Sabha  sakal
देश

Rajya Sabha : राज्याच्या दोन खासदारांत सभागृहात कलगीतुरा,मेधा कुलकर्णी -रजनी पाटील यांचे मराठीतून भाषण; दावे प्रतिदावे

राज्यसभेत दोन महिला खासदारांनी मराठीतून भाषणे दिली. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी महाराष्ट्राला मिळालेल्या निधीचा पाढा वाचला तर काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी महाराष्ट्र आत्महत्यांमध्ये पहिल्या क्रमांकांवर असल्याचे सांगून प्रत्युत्तर दिले.

सकाळ वृत्तसेवा

राज्यसभेत दोन महिला खासदारांनी मराठीतून भाषणे दिली. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी महाराष्ट्राला मिळालेल्या निधीचा पाढा वाचला तर काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी महाराष्ट्र आत्महत्यांमध्ये पहिल्या क्रमांकांवर असल्याचे सांगून प्रत्युत्तर दिले.

राज्यसभेत आज अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना महाराष्ट्रातील दोन महिला खासदारांनी आपआपल्या पक्षाची जोरदार भूमिका मांडली. मेधा कुलकर्णी यांचे अर्थसंकल्पावरील पहिलेच भाषण होते. त्यांनी मराठीतून सुरूवात करून केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलेल्या निधीचा आलेख वाचून दाखविला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी अनेक तरतुदी केल्या असून महाराष्ट्रावर निधीमध्ये अन्याय केल्याचा आरोप फेटाळून लावला.

महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, रेल्वेच्या विकासासाठी ऐतिहासिक तरतूद केल्याचा दावा खासदार कुलकर्णी यांनी केला. महाराष्ट्राच्या विकासासाठी ६ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. काँग्रेसने यूपीएच्या काळात केवळ १ हजार कोटी रेल्वेच्या विकासासाठी मिळाले होते. यावर्षी मात्र १५ हजारावर कोटी मिळाल्याचेही खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले. परंतु काँग्रेसच्या खासदारांना काविळ झाली आहे. त्यांना केवळ पिवळे दिसत आहे. हे लोक औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य असल्याचे खासदार कुलकर्णी म्हणाल्या.

मेधा कुलकर्णी यांच्या भाषणाला टीएमसीच्या काही सदस्यांनी आक्षेप घेतला व यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल बोलायला उभे राहिले. यामुळे सभागृहात काहीवेळ गोंधळ निर्माण झाला होता. पीठासीन अधिकारी प्रियांका चतुर्वेदी या वारंवार खासदार प्रफुल्ल पटेल यांना बसायला सांगत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: बाळासाहेबांची 'ती' इच्छा, पूर्ण कशी झाली सांगताना नरेंद्र मोदींचं 'मविआ'वर टीकास्त्र

Arjun Tendulkar च्या संघाचा विक्रम! Ranji Trophy च्या ९० वर्षांच्या इतिहासात कुणीच केला नव्हता असा पराक्रम

आर. के. नारायण यांच्या अजरामर कथांना उजाळा; ओटीटीवर बालदिनानिमित्त 'मालगुडी डेज'चा नजराणा

Share Market Closing: प्रचंड चढ-उतारानंतर शेअर बाजार घसरणीसह बंद; निफ्टी 23,532 अंकांवर, कोणते 10 शेअर्स वाढले?

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार - गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT