Rakesh Tikait  Rakesh Tikait
देश

टिकैत म्हणाले, हा तर चौधरी चरणसिंग यांचा अपमान

काँग्रेस खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनीही हरियाणा सरकारवर निशाणा साधला

सकाळ डिजिटल टीम

हरियाणा : हिस्सार येथील चौधरी चरणसिंग कृषी विद्यापीठाच्या वार्षिक शैक्षणिक दिनदर्शिकेवरून वाद निर्माण झाला आहे. कॅलेंडरमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल दत्तात्रेय आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो प्रकाशित झाले; मात्र, चौधरी चरणसिंग (Chaudhary Charan Singh) यांचा फोटो लावला नाही. विद्यापीठाचे नाव माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या नावावर आहे. या कॅलेंडरची छायाचित्रे समोर येताच शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) आणि काँग्रेस खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी निशाणा साधला आहे.

चौधरी चरणसिंग कृषी विद्यापीठाच्या शैक्षणिक दिनदर्शिकेवरून सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर कॅलेंडरची छायाचित्रे प्रसिद्ध करताना राकेश टिकैत यांनी लिहिले की, ‘आता शेतकरी आणि आपल्या पूर्वजांच्या आदर्शांचा अपमान करणाऱ्या ७०० शेतकऱ्यांच्या मृत्यूने समाधानी नाही. चौधरी चरणसिंग (Chaudhary Charan Singh) यांचा फोटो कॅलेंडरमधून काढून टाकणे हा केवळ त्यांचा अपमानच नाही तर देशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या स्वाभिमानावर झालेला आत्मघातकी हल्ला आहे, असे टिकैत (Rakesh Tikait) म्हणाले.

काँग्रेस (Congress) खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनीही हरियाणा सरकारवर निशाणा साधला. त्यांनी लिहिले की, कॅलेंडरमधून चौधरी चरणसिंग यांचा फोटो काढून टाकण्यात आला आहे. यापूर्वी जीजेयू विद्यापीठाच्या चौधरी रणबीर सिंग हुड्डा सभागृहातून त्यांचा फोटो काढून टाकण्यात आला होता. भाजप-जेजेपी (BJP) सरकारची अशी वागणूक हा कोणत्या राजकारणाचा भाग आहे, असे सरकारला घेरताना हुड्डा यांनी लिहिले आहे.

ही बाब समोर येताच विरोधी पक्षनेते आक्रमक झाले. कॅलेंडरवरून झालेल्या वादानंतर कृषी विद्यापीठ प्रशासनाने चौधरी चरण सिंह यांच्या फोटोसह नवे कॅलेंडर रात्री उशिरा जारी केले. जेणेकरून वाद थांबता यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde VIDEO: विनोद तावडेंना बविआ कार्यकर्त्यांनी हाॅटेलमध्ये घेरलं, पैसे वाटल्याचा आरोप करत घातला राडा, काय घडलं नेमकं?

Latest Marathi News Updates : एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा

IND vs AUS: विराट धावांचा भुकेला, ऑस्ट्रेलियात दुपटीने वसुली करेल, माजी भारतीय कर्णधाराचा विश्वास

Dhananjay Munde : जातीपातीचा विचार न करता विजयसिंहांना संधी द्यावी; गेवराई येथे मंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन!

Assembly Election : एवढ्या जागांवर होणार पवार विरुद्ध पवार, ठाकरे विरुद्ध शिंदे आणि भाजप विरुद्ध काँग्रेस लढत?

SCROLL FOR NEXT