बेंगळुरू: कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांच्यावर शाई फेकण्यात (Ink Attack) आल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्रकार परिषदेदरम्यान (Press ) हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर, या सर्व प्रकारानंतर एकमेकांवर खुर्चादेखील फेकण्यात आल्या. टिकैत यांनी काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आलेल्या कृषी कायद्यांसंदर्भातील (Farm Law) एका स्टिंग ऑपरेशनबद्दल बोलण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती त्यावेळी हा सर्व प्रकार घडला. शेतकरी नेते चंद्रशेखर (Chandrashekhar) यांच्या समर्थकांनी ही शाईफेक केल्याचा आरोप केला जात आहे. (Ink Attack On Farmer Leader Rakesh Tikait Bengaluru)
शेतकरी नेते चंद्रशेखर यांच्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे, असे विचारले असता टिकैत म्हणाले की, आमचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे उत्तर दिले. त्यानंतर उपस्थित चंद्रशेखर यांच्या समर्थकांनी संतप्त होत टिकैत यांच्यावर शाई फेकली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. एवढेच नव्हे तर, घटनेनंतर टिकैत यांचे समर्थक आणि शाईफेक करणाऱ्या गटात तुंबश हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटांकडून एकमेंकावर खुर्च्या फेकण्यात आल्या. त्यामुळे काहीकाळ येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
टिकैत यांनी काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आलेल्या कृषी कायद्यांसंदर्भातील एका स्टिंग ऑपरेशनबद्दल बोलण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती. या स्टिंग ऑपरेशनमध्ये कर्नाटकच्या एका शेतकरी नेत्याला पैसे मागताना पकडण्यात आले होते. दरम्यान, पत्रकार परिषदेदरम्यान घडलेल्या सर्व प्रकारानंतर टिकैत यांनी राज्यातील भाजप सरकारवर कार्यक्रमस्थळी योग्य ती सुरक्षा न पुरवल्याचा आरोप केला असून, घडलेला प्रकार सरकारच्या संगनमताने केल्याचे म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.