ram katha vachak dhirendra acharya disciple ran away with the host wife in Madhya Pradesh love story  
देश

Love Story : रामकथा पडली महागात! धीरेन्द्र आचार्यांचा शिष्य यजमानाच्या पत्नीला घेऊन सैराट

रोहित कणसे

रामकथा सांगण्यासाठी आलेल्या बाबा यजमानाच्या पत्नीलाच घेऊन पळाल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्यप्रदेशातील छतरपूर येथे हा प्रकार घडला आहे. कथावाचनासाठी सोबत आलेला बाबाचा शिष्याने यजमानाच्या पत्नीला पळवून नेले . दरम्यान या प्रकारानंतर पीडिताने पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधी तक्रार दिली असून पोलीसांनी हरवल्याची तक्रार नोंदवून घेतली आहे.

एक महिन्यानंतर जेव्हा पीडित व्यक्तीची पत्नी सापडली तेव्हा पोलीसांनी तीला पोलीस स्टेशनमध्ये तीचा जबाब नोंदवण्यासाठी बोलवलं. मात्र महिलेने पतीसोबत राहण्यास नकार दिला आणि चित्रकूट धामचे धीरेंद्र आचार्य यांचे शिष्य नरोत्तम दास दुबे सोबत राहायचं असल्याचे सांगितले.

हे प्रकरण २०२१ मध्ये सुरू झालं, जेव्हा या महिलेचा पती राहुल तिवारीने गौरीशंकर मंदिरात रामकथेचे योजन केले होते. या कार्यक्रमात कथा वाचनासाठी चित्रकूट येथील कथावाचक धीरेंद्र आचार्य यांना बोलवण्यात आलं. हे आचार्य त्यांचा शिष्य नरोत्तम दास दुबे याच्यासोबत रामकथेसाठी सोबत घेऊन आले होते.

दरम्यान या महिलेच्या पतीचा आरोप आहे की, या रामकथेदरम्यान त्याच्या पत्नीला नरोत्तम दास दुबेने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर मोबाईल नंबर घेतला आणि हे दोघे एकमेकांशी बोलू लागले. यानंतर ५ एप्रिल रोजी नरोत्तमने त्याच्या पत्नीला पळवून नेले.

याप्रकरणी जिल्ह्याचे एसपी अमित सांघी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला तिच्या पतीसोबत राहण्यास नकार देत आहे, त्यामुळे हा गुन्हा ठरत नाही. तरीही पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT