देश

Ram Mandir Pran Pratishtha : रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठेच्या विधीचा आज दुसरा दिवस, प्रभू श्रीरामांना दाखवण्यात येणार मंदिर परिसर

Aishwarya Musale

मागील कित्येक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा लवकरच केली जाणार आहे. २२ जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीरामांची प्रतिष्ठापणा केली जाणार आहे. त्यासाठी कालपासून अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या विधीवत पूजेला सुरूवात झाली आहे.

उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या प्राण-प्रतिष्ठेच्या विधीचा हा दुसरा दिवस आहे. आज, बुधवार, 17 जानेवारी रोजी दुपारी 1:20 नंतर जलयात्रा, तीर्थ पूजा, ब्राह्मण-बटूक-कुमारी-सुवासिनी पूजा, वर्धिनी पूजा, कलशयात्रा होईल. वैदिक अभ्यासक आचार्य गणेशवर शास्त्री द्रविड यांनी ही माहिती दिली आहे.

या प्राण-प्रतिष्ठेच्या विधींची सुरूवात ही सर्वप्रथम प्रायश्चित पूजेने केली जाणार आहे. या प्रायश्चित पूजेच्या माध्यमातून रामलल्लाची माफी मागितली जात आहे. असे मानले जाते की, प्रभू श्रीरामांची मूर्ती बनवण्यासाठी छिन्नी आणि हातोड्याचा वापर करण्यात आला, त्यामुळे, रामलल्लाला दुखापत झाली, त्याबद्दल माफी मागण्यासाठी ही प्रायश्चित पूजा आणि कर्मकूटी पूजा केली जात आहे. ही प्रायश्चित पूजा आणि कर्मकूटी पूजा नेमकी काय आहे? त्याबद्दल जाणून घेऊयात.

काय आहे प्रायश्चित पूजा?

प्रायश्चित पूजा ही एक प्रकारच्या उपासनेची पद्धत आहे. ज्यामध्ये, मानसिक, आंतरिक, शारिरीक आणि बाह्य अशा सर्व बाजूंनी प्रायश्चित केले जाते.

यातील बाह्य प्रायश्चित्तासाठी यजमानाला १० धार्मिक स्नान करावे लागतात. यामध्ये मग, पंचद्रव्य आणि इतर अनेक पदार्थांचा वापर करून स्नान केले जाते. आणखी एक प्रायश्चित गोदान देखील केले जाते आणि यामध्ये एक संकल्प देखील आहे.

यामध्ये यजमान गोदानाद्वारे प्रायश्चित करतात. तसेच, यामध्ये काही पैशांचे दान करून देखील प्रायश्चित केले जाते. पैशांसोबतच यामध्ये सोने दान करण्याचा देखील समावेश आहे.

कर्मकूटी पूजा काय आहे?

कर्मकूटी पूजा ही एक प्रकारची यज्ञशाळा पूजा आहे. ही यज्ञशाळा सुरू करण्यापूर्वी हवन कुंडाची पूजा केली जाते. त्यानंतर, भगवान विष्णूंची छोटीशी पूजा केली जाते. या पूजेनंतरच पुढील पूजेसाठी मंदिराच्या आत प्रवेश केला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chess Olympiad 2024: भारताने जिंकले ऐतिहासिक सुवर्णपदक! महिला-पुरुष दोन्ही संघ ठरले 'अव्वल'

अंधेरीचा राजाच्या विसर्जनादरम्यान बोट उलटली; १० ते १२ जण पाण्यात पडले, पाहा थरारक व्हिडिओ

Mega Block : रेल्वेच्या मेगा ब्लॉक मुळे मुंब्रा, दिवा, कोपर वासियांचे मेगा हाल

Sharad Pawar : यशवंतराव चव्हाणांसोबतचे 5 दशकापूर्वीचे छायाचित्र पाहून पवारांना झाला आनंद

Ajit Pawar : येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांचे वीज 'Zero Bill' करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार

SCROLL FOR NEXT