Ram Mandir Ayodhya
Ram Mandir Ayodhya esakal
देश

Ram Mandir Ayodhya: पहिल्या पावसात राम मंदिराच्या छताला गळती, मुख्य पुजाऱ्यांनी केली चौकशीची मागणी

Sandip Kapde

राम मंदिराच्या मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी मंदिराच्या बांधकामावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, पहिल्याच पावसात रामलला स्थापन असलेल्या जागेवर छत गळू लागली आहे. त्यांनी या समस्येची तपासणी करण्याची मागणी केली आहे.

राम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णतेबाबत आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की, 2025 पर्यंत मंदिराचे काम पूर्ण होणे शक्य नाही. त्यांनी नमूद केले की मंदिरात पाणी जाण्याचा मार्ग नाही, त्यामुळे समस्या मोठी आहे आणि यावर त्वरित तोडगा काढावा लागेल.

2025 पर्यंत राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार?

राम मंदिराच्या मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी राम मंदिराच्या बांधकामावर बोलताना म्हटले की, जुलै 2025 पर्यंत काम पूर्ण होणे अशक्य आहे. तसेच राम मंदिरात झालेल्या बांधकामावर प्रश्न उपस्थित करताना त्यांनी म्हटले की, जिथे रामलला विराजमान आहेत, तिथे पहिल्याच पावसात पाणी गळू लागले आहे, ज्याची चौकशी होणे आवश्यक आहे.

आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, जो राम मंदिर बनले आहे, त्यात पाणी बाहेर जाण्याचा कोणताही मार्ग नाही आणि वरून पाणी गळू लागले आहे. ही समस्या खूप मोठी आहे आणि सर्वप्रथम या समस्येचे निराकरण होणे आवश्यक आहे. मंदिर बांधकामाबाबत त्यांनी म्हटले की, जर असे म्हटले जात आहे की, मंदिराचे संपूर्ण बांधकाम 2025 मध्ये पूर्ण होईल तर ही चांगली गोष्ट आहे, परंतु हे अशक्य आहे कारण अजून खूप काही बांधायचे बाकी आहे. ( Ram Mandir Latest News)

अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी रामलला यांची प्राण प्रतिष्ठा मोठ्या कार्यक्रमाने झाली होती. अद्याप एक वर्षही पूर्ण झालेले नाही की राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांचे म्हणणे आहे की, पहिल्याच पावसात छतातून पाणी गळू लागले आहे. त्यांनी याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Arrival Live Updates : टीम इंडियाचा 'विजय रथ' अडकला गर्दीत; पोलिसांची तारांबळ

Prohibitory Orders: काय झाडी काय डोंगर...फिरायला जायचा प्लॅन करताय? तर थांबा! पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश वाचा

Water Salute: टीम इंडियाच्या विमानाला 'वॉटर सॅल्युट'; मुंबई विमानतळावरील दृश्य पाहून व्हालं थक्क

Rohit Sharma : वर्ल्डकपच्या गोल्ड मेडलसोबतच रोहित, बुमराहला आयसीसीकडून मिळणार अजून एक स्पेशल मेडल?

PF Schemes: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! वित्त मंत्रालयाने PF व्याजदरात केली वाढ

SCROLL FOR NEXT