Ram Mandir esakal
देश

Ram Mandir: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 22 जानेवारीला हाफ डे; कोण-कोणत्या राज्यांनी जाहीर केलीये सुट्टी?

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. यानिमित्त केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यांना अडीच वाजेपर्यंत सुट्टी असेल. राम मंदिर सोहळ्याला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे सोहळा पाहता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातयं. (Ram Mandir event Half day holiday for central government employees on January)

राम मंदिर सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहता यावे यासाठी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्यात आल्याची माहिती आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी २२ जानेवारीला सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल याबातमी पुष्टी केली आहे. सरकारने यासंदर्भात नोटिफिकेशन देखील जारी केले आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सोहळ्यात अप्रत्यक्षपणे सहभागी होता येणार आहे.

कोण-कोणत्या राज्यांमध्ये सुट्टी जाहीर?

उत्तर प्रदेश, गोवा, मध्य प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड इत्याही राज्यांना राम मंदिर सोहळ्यानिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने याबाबत अद्याप कोणतीही नोटीस काढलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील शिंदे सरकार देखील २२ जानेवारीला सुट्टी जाहीर करतं का हे पाहावं लागणार आहे. (Latest Marathi News)

राम मंदिराचे उद्घाटन होणार असल्याने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय प्रत्येक घरात यादिवशी दीप प्रज्वलन करण्यात येणार आहे. भाजपकडून या दिवशी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात पुढाकार घेण्यात आला आहे. अनेक शाळा-कॉलेज आणि कार्यलयांना या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आलीये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Health: उपोषणस्थळी भोवळ अन् रक्तदाबाचा त्रास, मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

देवेंद्र फडणविसांची मोठी खेळी! शरद पवार गटाचा वरिष्ठ पदाधिकारी भाजपच्या ताफ्यात, रोहितदादांना धक्का

Daughters Day निमित्त अश्विन लेकींना देणार स्पेशल बॉल, पण मुलींनीच दिला नकार; पाहा Video

Pune Rain Update : पुण्यातील काही भागात विजांचा कडकडाटसह मुसळधार पावसाला सुरूवात

विराट कोहली - ऋषभ पंतचा मैदानात दिसला याराना, गॉगल केले अदला-बदली; Video Viral

SCROLL FOR NEXT