Ram Mandir Pran Prathistha : अयोध्येतील राम मंदिरात आज रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यानिमीत्त देश भररात उत्सवाचे वातावरण आहे. देश विदेशातील अनेक मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की अयोध्येतील राम मंदिरासाठी सामान्य नागरिकांसह वेगवेगळ्या राज्यांकडून देखील मोठं योगदान देण्यात आलं आहे.
राम मंदिराच्या बांधकामात राजस्थानच्या नागौर येथील मकरानाचा वापर राम मंदिराच्या उभारणीत करण्यात आला आहे. राम मंदिराच्या गर्भगृहातील सिंहासन मकराना संगमरवरापासून बनवण्यात आले आहे.
या सिंहासनावर प्रभू राम विराजमान होणार आहेत. या सिंहासनावर सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. गर्भगृह आणि फरशी मकराना या पांढऱ्या मार्बलची बसवण्यात आली आहे. मंदिरातील खांबांसाठी देखील हेच मार्बल वापरण्यात आले आहे.
मंदिरातील देवतांच्या प्रतिमा असलेली नक्काशी कर्नाटकच्या चमोर्थी दगडावर करण्यात आली आहे. यासोबतच प्रवेश द्वारावर काढण्यात आलेल्या प्रतिमांसाठी राजस्थानच्या बंसी पहाडपूर येथील गुलाबी दगड वापरण्यात आले आहेत. गुजरात येथून 2100 किलोग्रॅम अष्टधातूची घंटा देखील आणण्यात आली आहे.
गुजरातच्या अखिल भारतीय दरबार समाजाकडून 700 किलोग्रॅमचा रथ देखील भेट म्हणून देण्यात आला आहे. भागवान श्रीरामांची मूर्ती बनवण्यासाठी काळा पाषाण कर्नाटकातून आणण्यात आला होता. अरुणाचल प्रदेश आणि त्रिपूरा येथून नक्काशीदार लाकडाचे दरवाजे आणि हातांनी बनवलेले फॅब्रीक्स आणण्यात आले आहे.
पितळेची भांडी उत्तर प्रदेशातून आणण्यात आले आहेत. तर पॉलिश केलेले सागवान लाकूड महाराष्ट्रातून पाठवण्यात आलं आहे. मंदिराच्या बांधकामात वापरण्यात आलेल्या विटा तब्बल पाच लाख गावातून आणण्यात आल्या होत्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.