yogi adityanath  Esakal
देश

Yogi Adityanath:'राम मंदिरासाठा माझ्या तीन पिढ्यांचं योगदान' योगी आदित्यनाथ म्हणाले...

Yogi Adityanath on Ram Mandir: योगी आदित्यनाथ यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगतिले की , त्यांच्या तीन पिढ्यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी संघर्ष केलाय.

सकाळ डिजिटल टीम

Yogi Adityanath on Ram Mandir:उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच एएनआय या संस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले की राम मंदिराच्या निर्माण कार्यात त्यांच्या तीन पीढ्यांचे योगदान आहे. यावेळी ते म्हणाले की राम मंदिराचं निर्माण भारत स्वातंत्र्य होताचं १९४७मध्ये व्हायला पाहिजे होतं. मात्र, त्यावेळीच्या सरकारांमध्ये संस्कृतीबद्दल असणाऱ्या दुराव्यामुळे हे शक्य झालं नाही. ते म्हणाले की अयोध्येचा वाद १९४७ नंतर १९४९मध्ये कधीही सोडवता आला असता, पण असं होऊ दिलं नाही.

योगी म्हणाले की हे त्यांचं सौभाग्य आहे की त्यांच्या शासनकाळात भगवान रामाचं मंदिर बनतं आहे. त्यांना या भागाचं मुख्यमंत्री आणि एक रामभक्त असल्याने या गोष्टीचा आनंद आहे. त्यांनी सांगितलं की या कार्याला देशभरातून लोकांचं सहकार्य मिळतं आहे. योगी आदित्यनाथ म्हणाले की त्यांच्या तीन पिढ्या रामलल्लासाठी लढाई करत आहेत.

तीन पिढ्यांच्या लढाईविषयी विचारल्या गेल्यावर ते म्हणाले की,"माझे पूज्य दादागुरु महंत विजयनाथ यांनी १९४९मध्ये या अभियानात भाग घेतला होता.

जेव्हा रामलल्लाचं प्रकटीकरण झालं तेव्हा त्यावेळी असलेल्या कॉंग्रेस सरकारला रामलल्लाला रामजन्मभूमीतून हटवायचं होतं. तेव्हा राम मंदिराच्या आंदोलनाला गोरक्षनाथ मंदिराचे समर्थन मिळाले होते."

योगी म्हणाले की १९८३-८४मध्ये जेव्हा रामजन्मभूमी मुक्तीसाठी समिती बनवण्यात आली, तेव्हा या समितीचे नेतृत्व त्यांचे गुरु महंच अवैद्यनाथ यांनी केलं होतं. तेव्हा त्या आंदोलनाचं नेतृत्व त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या मार्गदर्शनाखाली केले होते.

जेव्हा अयोध्येत भगवान रामाच्या मंदिराचा पाया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठेवला गेला, तेव्हा उत्तरप्रदेशचा मुख्यमंत्री या नात्याने ते स्वत: त्या ठिकाणी उपस्थित होते. हा क्षण त्यांच्यासाठी खुप गौरवान्वित करणारा होता, असे योगी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाविकास आघाडीकडून व्होट जिहादचे काम; आता एक व्हावं लागेल'

Latest Maharashtra News Updates live : छत्तीसगढच्या कांकेरमध्ये ५ नक्सलवाद्यांचा खात्मा

Government Job : सरकारी नोकरी मिळवण्याचे सोपे मार्ग: भारतातील ९ सर्वात सोप्या सरकारी परीक्षा

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

'बिग बॉस १८' मध्ये सलमानने घेतली अश्नीर ग्रोवरची शाळा; दोगलापन वाल्या डायलॉगवर भाईजान नाराज

SCROLL FOR NEXT