Ramayana to be taught at madrassas Esakal
देश

Ramayana to be taught at Madrassas: आता मदरशांमध्ये दिले जाणार रामायणाचे धडे! वक्फ बोर्डाचा मोठा निर्णय

Ramayana to be taught at madrassas: उत्तराखंडमधील मदरशांमध्येही रामायण शिकवले जाणार आहे. वक्फ बोर्डाने याबाबतचा निर्णय घेतला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

उत्तराखंडमधील मदरशांमध्येही रामायण शिकवले जाणार आहे. वक्फ बोर्डाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाशी संलग्न असलेल्या मदरशांमध्ये आता रामायण शिकवलं जाणार आहे. रामायणाचा अभ्यासक्रम म्हणून समावेश केला जाणार आहे. वक्फ बोर्डाच्या अंतर्गत असलेल्या एकूण 117 मदरशांपैकी चार मदरशांमध्ये सुरुवातीला नवीन अभ्यासक्रम सुरू केला जाईल.

बोर्डाच्या अंतर्गत असलेल्या 117 मदरशांपैकी, डेहराडून, हरिद्वार, नैनिताल आणि उधम सिंह नगर जिल्ह्यातील चार मदरशांमध्ये सुरुवातीला नवीन अभ्यासक्रम सुरू केला जाईल. शिक्षकांची भरती झाल्यानंतर उर्वरित 113 मदरशांमध्ये ही नियुक्ती केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मदरशांमध्ये रामायण वाचल्याने मुलांना त्यांच्या संस्कृतीशी जोडण्याची संधी मिळेल. मुलांना श्रीरामचे चरित्र जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर मदरशातील मुलांना ड्रेसकोड देखील बदलण्यात येणार आहे.

कुराणसह रामायण शिकवले जाणार

उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले की, कुराणसोबतच आम्ही विद्यार्थ्यांना रामायणही शिकवू. वक्फ बोर्ड चार मदरशांसाठी मुख्याध्यापकांची नियुक्ती करेल, ज्यांना या विषयात पारंगत शिक्षकांची नियुक्ती करण्याचे काम दिले जाईल. मंडळाने पुढे सांगितले की, नवीन अभ्यासक्रमाच्या परिचयासाठी विस्तृत व्यवस्था करण्यात येत आहे.

शादाब शम्स म्हणाले की, निवडलेल्या चार मदरशांना स्मार्ट क्लासरूमसह विकसित केले जाईल. या संस्थांचे शैक्षणिक दर्जा सुधारण्याची नितांत गरज आहे आणि आम्ही नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग पुस्तके सादर करण्याच्या प्रक्रियेत आहोत.

वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांच्या मते, या वर्षी मार्चपासून आमच्या मदरसा आधुनिकीकरण कार्यक्रमाचा भाग म्हणून वक्फ बोर्डाशी संलग्न असलेल्या मदरशांमध्ये श्री रामचा अभ्यास सुरू केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT