नवी दिल्ली - समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी रामपूर विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीवरून पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. "पोलीस लोकांना त्यांच्या घरात घुसून धमकावत आहेत. लोकांना सांगण्यात येतय की, जर त्यांनी सपाला मतदान केलं तर त्यांची घरं रिकामी करण्यात येईल. माजी खासदार आणि माजी आमदार असलेल्या माझ्या पत्नीला देखील पोलिसांनी सोडलेलं नाही, असं आझम खान म्हणाले.
पोलिसांनी माझ्या पत्नीला घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना केल्या आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीने निवडणूक घ्यायची असेल तर निवडणूक आयोगाने भाजपच्या उमेदवाराला विजयी घोषित करावं, अशा शब्दात खान यांनी संताप व्यक्त केला.
आझम खान म्हणाले की, आम्ही करत असलेल्या आरोपांचे पुरावे आमच्याकडे आहेत. व्हिडिओ फुटेज आणि रेकॉर्डिंग आहे, परंतु काही विशिष्ट कारणास्तव आम्ही ते माध्यमांना उपलब्ध करून देत नाही. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत जे काही घडलं, ते कुणापासून लपून राहिलेलं नाही, असं ते म्हणाले. आता विधानसभा पोटनिवडणुकीबाबतही असेच वातावरण तयार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
शनिवारी रात्री पोलिसांनी 50 घरांचे दरवाजे तोडले आणि महिलांशी गैरवर्तन केले, असा आरोप आझम खान यांनी केला. रामपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव, रालोदचे अध्यक्ष जयंत चौधरी आणि भीम अमीचे चंद्रशेखर हे देखील येणार आहेत. इथं निवडणूकच होत नाहीये मग हे नेते का येतायत रामपूरमध्ये असा उपरोधिक सवाल आझम खान यांनी उपस्थित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.