Himachal Pradesh Rain  sakal
देश

Himachal Pradesh Rain : ढगफुटीत ५० जण दगावल्याची भीती ; हिमाचलमध्ये वेगाने बचाव कार्य ,तीनशे कोटींच्या प्रकल्पालाही फटका

केरळच्या भूस्खलनाच्या घटनेच्या पाठोपाठ हिमाचल प्रदेशात ढगफुटीची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

सिमला : केरळच्या भूस्खलनाच्या घटनेच्या पाठोपाठ हिमाचल प्रदेशात ढगफुटीची घटना घडली. हिमाचलमध्ये सध्या लष्कर, पोलिस, एनडीआरएफ यांच्यासह विविध पथकांकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू या भागात सुमारे ५० जण मृत्युमुखी पडल्याची भीती राज्याचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील बचाव मोहीम पूर्ण झाल्यानंतर मृतांची अधिकृत आकडेवारी जाहीर केली जाईल, असे त्यांनी नमूद केले. बेपत्ता लोकांचा आणि मृतदेहांचा शोध लावणे तसेच दळणवळण यंत्रणा सक्रिय करण्यावर भर राहणार असल्याचे ते म्हणाले. बागीपूल येथील तीनशे कोटींच्या निर्माणधिन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला पावसाचा फटका बसला आहे. या नैसर्गिक संकटातील पीडित कुटुंबांना तत्काळ प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची घोषणा हिमाचल सरकारकडून करण्यात आली तसेच भविष्यात आणखी भरपाई दिली जाईल, असेही विक्रमादित्य सिंह म्हणाले. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुक्खू यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली असून केंद्र सरकारकडून आणखी मदत मिळायला हवी आणि तशी मागणी करत असल्याचे ते म्हणाले. एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलिस आणि गृहरक्षक दलाचे जवान बचावकार्यात काम करत आहेत.

श्रींखंड पर्वताच्या टोकावर दोन तीन दिवसांपूर्वी ढगफुटी झाल्याने रामपूर आणि कुल्लू येथे हाहा:कार माजला. या भागाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली असून त्यांनी मदतकार्याची माहिती घेतली आहे. विविध ठिकाणी बेली ब्रिज तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच नागरिकांत गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांना नेमण्यात आले आहे. तत्पूर्वी भारतीय लष्कराने हिमाचल प्रदेशच्या समेज गावातील लोकांना मदतीसाठी व्यापक प्रमाणात मानवीय सहायता आणि आपत्ती निवारण अभियान सुरू केले. रस्त्यावर भूस्खलन झाल्याने समेज गावापर्यंत जाता येत नसल्याचे लष्कराने सांगितले. त्यामुळे जवानांना घटनास्थळी पायी जावे लागले. नंतर इंजिनिअर टास्क फोर्सने या मार्गाची दुरुस्ती केली.त्यामुळे उपकरणे दाखल झाली. फुटब्रिजचे काम पूर्ण झाल्याचे लष्कराने सांगितले. या ब्रिजमुळे बचाव पथकाला अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास मदत झाली.

५३ नागरिक बेपत्ता

जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानुसार हिमाचल प्रदेशच्या कुलू, मंडी आणि सिमला येथे ढगफुटी झाल्याने आलेल्या पुरामुळे प्रचंड हानी झाली आहे. तेव्हापासून आजपर्यंत ५३ नागरिक बेपत्ता आहेत. बचावपथकाला सहा मृतदेह सापडले आहेत. पुरात साठपेक्षा अधिक घरे वाहून गेली आहेत आणि अनेक गावांना त्याचा फटका बसला आहे. सिमला जिल्ह्यातील समेज भाग, रामपूर, कुलूतील बाघीपूल, मंडीचे पद्दार येथे ढगफुटी झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. रामपूर येथे दुरुस्तीचे काम सुरु आहे. पावसामुळे समेज आणि रामपूर भागाला जोडणाऱ्या रस्त्याची हानी झाली आहे. मंडीत सर्वाधिक पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर कुलूत एकाचा मृत्यू झाला आहे. पावसाने बागीपूल येथील बांधकामस्थितीत असलेल्या कुरपान खाड पाणीपुरवठा योजनेची मोठी हानी झाली असून या योजनेसाठी ३१५ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी भेट देऊन त्याची माहिती घेतली.

अस्मानी संकट

बेपत्ता

  • सिमला ३३

  • कुलू ९

  • मंडी ६

  • ५५

  • छावण्यातील नागरिक

    २५

  • अडकलेले नागरिक

    ६१

  • घरांची हानी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT