Bhosala Vasma Charitra Book sakal
देश

मराठेशाहीची माहिती देणारे दुर्मीळ पुस्तक प्रकाशित

सकाळ वृत्तसेवा

तंजावर - तमिळनाडूमधील तंजावर येथील तंजावर महाराज सर्फोजी राजे, सरस्वती महाल ग्रंथालयाच्या वतीने भोसले वंश चरित्र या पुस्तकाची चौथी आवृत्ती प्रकाशित करण्यात आल्याने मराठेशाहीची अस्सल माहिती देणारे हे दुर्मीळ पुस्तक इतिहास प्रेमींना आणि वाचकांना पुन्हा उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसह मराठा साम्राज्यातील महान राजांचा इतिहास समाविष्ट करण्यात आला आहे. विविध शिलालेखांसह तंजावर येथील सरस्वती महाल येथील ऐतिहासिक प्राचीन ग्रंथ व अनेक अस्सल पुराव्यांच्या आधारे या ग्रंथाचे लेखन करण्यात आले असल्याचे ग्रंथालयाच्या वतीने सांगण्यात आले.

हे पुस्तक तमीळ, इंग्रजी आणि मराठीमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरणार असल्याचे ग्रंथालयाच्या वतीने सांगण्यात आले.

हे पुस्तक सरस्वती महाल ग्रंथालयात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे, त्याच प्रमाणे tanjorerajahserfoji2 museum@gmail.com. या ई-मेल आयडीवर या पुस्तकाची ऑनलाइन मागणी करता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet katke IT Raid : महाराष्ट्र केसरी अभिजित कटके याच्या घरी आयकर विभागाची छापेमारी!

त्या रात्री नेमकं काय घडलं ? सलमानच्या गाजलेल्या काळवीट शिकार प्रकरणाची जाणून घ्या पूर्ण स्टोरी

Latest Maharashtra News Updates :30 विमानांना पुन्हा बॉम्बची धमकी, इंडिगो, विस्तारा आणि एअर इंडियाला अलर्ट

Nashik West Vidhan Sabha Election 2024 : सीमा हिरे विरोधकांची अपूर्व हिरेंना गळ; तूर्तास ‘वेट ॲन्ड वॉच’चा सल्ला

Eknath Shinde: या तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल करणार अर्ज, ठाण्यात भव्य शक्तीप्रदर्शन

SCROLL FOR NEXT