जगातील सर्वात छोटी कार बनवून जगभर प्रसिद्ध झालेले रतन टाटा हे भारतातील एक अतिशय प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक आहेत. टाटांनी त्यांचा व्यवसाय आज जगभर पसरवला आहे. पण, त्यांचा साधेपणाही तितकाच प्रसिद्ध आहे. त्यांचा आज 85 वा वाढदिवस आहे.
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबई येथे एका पारशी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा आणि आईचे नाव सोनू टाटा होते. नवल टाटा हे जमशेदजी टाटा यांचा धाकटा मुलगा होते. रतन टाटा हे त्यांचे दत्तक घेतलेला मुलगा होता. जमशेदजी टाटा हे टाटा कंपन्यांचे संस्थापक होते.
1948 मध्ये रतन टाटा दहा वर्षांचे असताना त्यांच्या आई वडिलांचे घटस्फोट झाले. आणि त्यानंतर, त्यांचे पालनपोषन त्यांच्या आजी नवाजबाई टाटा यांनी केले. त्यांनी चॅम्पियन स्कूल, मुंबई येथून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि आर्किटेक्ट होण्याच्या इच्छेने रतन टाटा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले.
टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इंडियन हॉटेल्स आणि टाटा टेलिसर्व्हिसेस या काही प्रमुख कंपन्या त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. इतक्या उंचीवर जाताना त्यांना अनेक चढ-उतारांचा आणि अपमानाचा सामना करावा लागला होता. आज त्यांचा जन्मदिनानिमित्ताने त्याच्या जीवनातील तो किस्सा जाणून घेऊयात.
एका कार्यक्रमात रतन टाटा यांच्या अगदी जवळचे असलेले प्रवीण कडले यांनी फोर्डची एक गोष्ट सांगितली. रतन टाटा यांनी 1998 मध्ये हॅचबॅक कार इंडिका बाजारात आणली होती.
परंतु ऑटो अॅनालिस्टने या कारवर पूर्णपणे टीका केली आणि परिणामी, विक्रीवर असलेल्या टाटा इंडिकाला बाजारातून चांगला प्रतिसाद मिळाला नाही आणि 1 वर्षाच्या आत टाटा इंडिका फ्लॉप झाली, ज्यामुळे टाटा मोटर्सचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर रतन टाटा यांना निर्णयावर अनेकांचे टोमणे ऐकावे लागले.
त्यानंतर काही जवळच्या लोकांनी आणि गुंतवणूकदारांनी रतन टाटा यांना इंडिकामुळे झालेला तोटा भरून काढण्यासाठी त्यांचा कारचा व्यवसाय दुसऱ्या कंपनीला विकण्याचा सल्ला दिला, कारण रतन टाटा यांची कार लॉन्च करण्याची योजना होती आणि ती तोट्याची होती. टाटा यांनी ही सूचना योग्य समजली आणि ती स्वीकारली. आपली कार कंपनी भागीदारांसोबत फोर्ड कंपनीला विकण्याचा प्रस्ताव रतन टाटा आणि त्यांच्या भागीदारांची फोर्ड कंपनीसोबतची बैठक सुमारे 3 तास चालली.
फोर्ड कंपनीचे चेअरमन बिल फोर्ड हे रतन टाटा यांनी त्यांना कडू शब्द सुनावले. जमत नव्हतं तर कशाला या कारच्या धंद्यात उतरलास. करण्यासारखी बरीच कामे आहेत. आता तुझी कंपनी विकत घेऊन मी तुझ्यावरच उपकार करत आहे हे वाक्य रतन टाटा यांच्या मनावर कोरले गेले. प्रयत्न करणं आणि त्यात अपयशी होणं हि तर शिकण्यासारखीच गोष्ट आहे. पण, टाटांनी हा अपमान सकारात्मकरित्या घेतला. त्यांनी फोर्डला चांगला कार व्यवसायिक होऊन दाखवायचं पक्क केलं.
या गोष्टीनंतर दहा वर्षांचा काळ लोटला. त्यावेळी टाटा ही जगप्रसिद्ध कंपनी बनली होती. तर, फोर्डसारख्या टॉप कार कंपनीला उतरती कळा लागली होती. एकेकाळी जशी वेळ टाटांवर आली तशीच वेळ फोर्डवर आली. फोर्ड कंपनीला आपल्या जग्वार आणि लँड रोव्हरमुळे तोटा सहन करावा लागत होता.
2008 पर्यंत फोर्ड कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली. त्यावेळी रतन टाटा यांनी फोर्ड कंपनीसमोर त्यांची लक्झरी कार जॅग्वार आणि लँड रोव्हर खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. जो फोर्ड कंपनीचे चेअरमन बिल फोर्ड यांनी स्वीकारला. पुन्हा एकदा फोर्ड कंपनीचे चेअरमन बिल फोर्ड, रतन टाटा आणि त्यांचे भागीदार यांच्यात बैठक झाली. टाटांनी जॅग्वार आणि लँड रोव्हर मॉडेल्सची फोर्ड कंपनीकडून $2.3 अब्ज रुपयात खरेदी केली.
या गोष्टीमुळे चेअरमन बिल फोर्ड हेच रतन टाटा यांना म्हणाले, तुम्ही आमची कंपनी विकत घेऊन आमच्यावर खूप मोठे उपकार करत आहात. त्यामूळेच आज जग्वार आणि लँड रोव्हर टाटाचे भाग आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.