Shantanu Naidu goodbye Post for Ratan Tata 
देश

Ratan Tata : ही दोस्ती..! रतन टाटांसाठी भावुक झाला शंतनू; पोस्ट लिहीत म्हणाला, "दु:ख ही प्रेमासाठी..."

Ratan Tatas Friend Shantanu Naidu Linked in Post : देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरातून शओक व्यक्त केला जात आहे.

रोहित कणसे

देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. राजकारणापासून ते क्रीडा जगतातील असंख्य दिग्गजांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यादरम्यान रतन टाटा यांचे सर्वात जवळचे मित्र आणि त्यांच्या कायम सोबत राहाणारे सहकारी शांतनू नायडू यांनी एक अत्यंत भावनिक पोस्ट लिहीली आहे.

रतन टाटा यांचे जवळचे मित्र शांतनू नायडू यांनी गुरूवारी सकाळी एक पोस्ट लिहीत पद्म विभूषण रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा हे दीर्घकाळापासून आजारपणाशी लढा देत होते, अखेर बुधवारी रात्री उशिरा वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

शांतनू नायडू यांची पोस्ट

रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर शांतनू नायडू यांनी आपल्या लिंक्डइन अकाउंटवर एक भावनिक पोस्ट लिहीली आहे. फोटो शेअर करत त्यांनी रतन टाटा यांच्यासोबतच्या त्यांच्या गाढ मैत्रीबद्दल या पोस्टमध्ये भाष्य केलं आहे.

रतन टाटा यांच्या कार्यालयाचे व्यवस्थापक ३० वर्षीय शंतनू नायडू यांनी लिहिले की, "या मैत्रीनंतर आता माझ्यात एक पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढण्यासाठी मी माझे उर्वरित आयुष्य घालवीन. दु:ख ही प्रेमासाठी मोजावी लागणारी किंमत आहे. गुडबाय, माय डियर लाईटहाऊस."

रतन टाटा यांच्यासोबत शांतनू नायडू यांची मैत्रीही प्राण्यांबद्दल त्या दोघांनाही वाटणाऱ्या प्रेमामुळे वाढीस लागली. दोघांची भेट २०१४ मध्ये झाली होती, जेव्हा नायडू यांनी रात्रीच्या अंधारात भटकी कुत्री वाहानांखाली येऊ नयेत यासाठी 'रिफ्लेक्टिव कॉलर' विकसित केले होते. त्यांच्या या पुढाकारामुळे प्रभावित झालेल्या टाटांनी नायडू यांना आपल्यासाठी काम करण्याचे निमंत्रण दिले. विशेष म्हणजे मागील १० वर्षात शांतनू नायडू रतन टाटा यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू मित्र बनले होते.

टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे वयाच्या ८६ वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले आहे. यानंतर टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी एका निवेदनात म्हटले की रतन टाटा यांनी फक्त टाटा समूहच नाही तर देशाच्या मूळ स्वरूपाला आकार दिला. आम्ही अत्यंत दुःखी अंतकरणाने रतन नवल टाटा यांना निरोप देत आहोत. ते एक अद्भूत लिडर होते, ज्यांच्या अतुलनिय योगदानाने फक्त टाटा समूहच नाही तर देशाच्या मूळ स्वरूपाला आकार दिला गेला असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT