Ratan Tata Monsoon Tips esakal
देश

Ratan Tata Monsoon Tips : पावसाळ्यात गाडी चालवण्याआधी हे काम नक्की करा, रतन टाटांनी शेअर केल्या टिप्स

Monsoon Tips : पावसाळ्यात ड्रायव्हिंग करणं फार कठीण होतं. त्यामुळे याविषयी काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक असतं.

धनश्री भावसार-बगाडे

Ratan Tata Monsoon Tips In Marathi : भारतात पावसाळा जोरदार सुरू झालेला आहे. अशात कार ड्रायव्हिंग करणं फारच कठीण होतं. त्यांमुळे पावसाळ्यात कार चालवण्याआधी आणि चालवताना काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक असतं. यामुळे आपण अपघात टाळू शकतो.

या सीझनमध्ये माणसांबरोबर जनावरांचीही काळजी घ्यायला हवी. अॅनिमल लव्हर रतन टाटा यांनी जनावरांना सुरक्षित ठेवण्यासंदर्भात काही महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत. त्यांचं कुत्र्यांवर विशेष प्रेम आहे.

रतन टाटा जनावरांच्या अधिकारांविषयी कायमच जागरुक असतात आणि त्याविषयी समाजात गारुकता वाढवण्याचे कार्यही करत असतात. त्यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून पावसाळ्यात मोकाट कुत्रे आणि मांजरी यांना होणाऱ्या धोक्यांशी निगडीत जागरुकता वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

Ratan Tata Monsoon Tips

काय सांगतात टाटा?

पावसाळ्यात हे प्राणी स्वतःला पावसापासून वाचवण्यासाठी कारच्या खाली आडोशाला बसतात. त्यामुळे नागरिकांनी याविषयी जागरुक असावे असे रतन टाटा यांनी सांगितले. त्यामुळे कार चालू करण्याआधी असे कोणते प्राणी कार खाली बसले आहेत का चेक करा असा सल्ला टाटांनी दिला आहे.

त्यांनी लिहिलं आहे की, जर आपल्याला माहित नसेल की, कार खाली कोणता प्राणी आहे तर आपण गाडी चालू केल्याने त्या प्राण्याला मोठी दुखापत होऊ शकते. ते अपंग होऊ शकतात. त्यामुळे जर आपण या सिझनला त्यांना शेल्टर देऊ शकलो तर उत्तम होईल.

Ratan Tata Monsoon Tips

या ट्वीट नंतर लोकांनी रतन टाटांचे खूप कौतुक केले. रतन टाटा आपल्या कामाबरोबरच चॅरीटीसाठीसुद्धा ओळखले जातात. शिवाय प्राण्यांविषयीचे ते आपले प्रेमही वेळोवेळी व्यक्त करत असतात. पावसाळ्यातही त्यांनी लोकांना जागरुक करण्याचे काम केले आहे.

बऱ्याचदा आपण कार खाली न बघताच कार सुरू करतो आणि मग त्या खाली बसलेले कुत्रे, मांजरं दाबले जातात. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत होते. त्यामुळे गाडी सुरु करण्याआधी त्याखाली बघा.

एवढेच नाही तर वाहन सुरु केल्यानंतर ३० सेकंद पुढे सरकू नये. त्याच जागी उभे रहावे. म्हणजे जर कोणी प्राणी चुकून खाली राहिलाच असेल तर तो बाहेर निघून पळून जाऊ शकेल.

याशिवाय पावसाळ्यात ड्रायव्हिंग करतानाही काळजी घ्यायला हवी. आपल्या वाहनाला कायम योग्य स्थितीत ठेवायला हवे. लाइट्स, ब्रेक्स, इंजिन इत्यादी गोष्टी तपासून घ्याव्या. शिवाय रस्त्याने चालताना स्पीडपण नियंत्रित असावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT