महागाईच्या छळा आज प्रत्येक व्यक्तीला बसत आहेत. त्यामुळे दररोजचा खर्च भागवणं अवघड होत चाललं आहे. खाण्यापिण्याच्या गोष्टीही सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लावत आहेत. त्यातही शाकाहारी लोकांना तर महागाईचा फटका आणखी जास्त बसत आहे.
रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या अहवालामध्ये जेवणाच्या ताटाचं पूर्ण बजेट सांगण्यात आलं आहे. याच्यानुसार, एका वर्षामध्ये शाकाहारी जेवण २४ टक्के तर मांसाहारी जेवण १३ टक्के महागलं आहे.
क्रिसिलने ऑगस्ट २०२३ आणि ऑगस्ट २०२२ या कालावधीतल्या खाण्यापिण्याच्या गोष्टींच्या किमतीच्या आधारे शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाला येणारा खर्च अंदाजे ठरवला. शाकाहारी थाळीमध्ये भाजी, चपाती रस्सा, कोशिंबिर अशा सगळ्याचा समावेश आहे. तर मांसाहारी थाळीमध्ये हे सर्व पदार्थ तसंच मांसाची किंमत समाविष्ट आहे.
शाकाहारी थाळी गेल्या वर्षी २७ रुपये होती, पण या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यामध्ये शाकाहारी थाळीची किंमत ३३ रुपयांहून अधिक झाली आहे. तर गेल्या वर्षी मांसाहारी थाळीची किंमत गेल्या वर्षी ६० रुपयांच्या आसपास होती, तर या वर्षी मांसाहारी थाळीची किंमत ६७ रुपयांहून अधिक आहे. तसंच या अहवालातून हेही समोर आलं आहे की जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये थाळीची किंमत थोडी कमी आली आहे, जुलैमध्ये शाकाहारी थाळी ३४ रुपये तर मांसाहारी थाळी ६८ रुपयांच्या आसपास होती.
महागाई सातत्याने वाढत आहे. त्यामुळे वर्षभरात टोमॅटो, कांदा, चिकन यांच्या किमतीही वाढल्या आहेत. यामुळेच शाकाहारी आणि मांसाहारी थाळी महाग झाली आहे. एका वर्षामध्ये टोमॅटोची किंमत १७६ टक्के वाढली आहे. गेल्या वर्षी ३७ रुपये किलो दराने मिळणारे टोमॅटो आता १०२ रुपये किलो झाले आहेत. अशाच पद्धतीने कांद्याचे दर ८ टक्के, मिरची २० आणि जिऱ्याचे दर १५८ टक्क्यांनी वाढले आहेत.
शाकाहारी जेवणाच्या तुलनेत मांसाहारी जेवणाच्या किमतीत जास्त वाढ झालेली नाही. कारण ब्रॉयलरची किंमत दरवर्षी १ ते ३ टक्क्यांनी वाढली आहे. दिलासादायक गोष्ट अशी की एका वर्षामध्ये वनस्पती तेलाची किंमत १७ टक्के आणि बटाट्याची किंमत १४ टक्क्यांनी कमी झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.