rath yatra gets underway in puri after series of rituals of three deities sakal
देश

Jagannath Rath Yatra 2023 : ‘जय जगन्नाथ’च्या जयघोषात रथयात्रा

पुरीत देवतांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; अहमदाबादेतही उत्साह

स्मृती सागरिका कानुनगो

भुवनेश्‍वर : ओडिशातील तार्थस्थान पुरी येथील जगन्नाथाच्या वार्षिक रथयात्रेला मंगळवारी भाविकांच्या अलोट गर्दीत साजरी झाली. जगन्नाथ व बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या पाहांडी विधीला सकाळी मोठ्या भक्तीभावात सुरुवात झाली. तीनही देवतांच्या प्रतिमा मिरवणुकीने मंदिराबाहेर आणल्यानंतर तीन रथांमध्ये त्यांची स्थापना करण्यात आली. ‘जय जगन्नाथ’ आणि ‘हरी बोल’च्या जयघोषात रथ ओढण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

पुजाऱ्यांनी सुरुवातीला भगवान सुदर्शनाची प्रतिमा देवी सुभद्रेच्या दर्पदलान रथापर्यंत नेली. त्यानंतर क्रमाने बलभद्र यांची प्रतिमा तळध्वज रथ, सुभद्रेची तिच्या रथावर आणि भगवान जगन्नाथाची प्रतिष्ठापना नंदीघोष रथावर करण्यात आली. कडक ऊन आणि दमट हवामान असूनही देवतांच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने जमलेल्या भाविकांच्या उत्साहावर कोणताही परिणाम झाला नाही. मंदिरासमोरील बडा दंडा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.

भक्तांना आशीर्वाद

रथयात्रेत पाहांडी विधीचे खूप महत्त्व आहे. यामध्ये तिन्ही भावंडांना मिरवणुकीने श्री जगन्नाथ मंदिरापासून त्यांच्या भव्य रथापर्यंत मिरवणुकीने आणले जाते. हे एक आकर्षक आणि मनमोहक दृश्य असते. भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा भाविकांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या पवित्र निवासस्थानातून बाहेर येतात, असे या विधीत मानले जाते. देवतांनी त्यांच्या रथांकडे संथ गतीने केलेला प्रवास याला ‘पाहांडी’ म्हणतात. यासाठीची तयारी मंदिर परिसरात केली जाते. पुजारी देवतांना आकर्षक व सुंदर पोशाख घालतात.

अहमदाबादेत १४६ वी रथयात्रा उत्साहात

अहमदाबाद : पुरीप्रमाणेच गुजरातमधील रथयात्रेलाही मोठी परंपरा आहे. अहमदाबाद येथे आज भगवान जगन्नाथाची १४६ वी रथयात्रा आज उत्साहात पार पडली. यावेळी दर्शनासाठी हजारो भाविक उपस्थित होते. जमालपूर भागात ४०० वर्षे जुन्या असलेल्या जगन्नाथ मंदिरापासून या यात्रेला सुरुवात झाली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सकाळी पाहांडी विधीला सुरुवात केली.

जगन्नाथ, बलभद्र व सुभद्रा यांच्या रथांचा मार्ग यावेळी सोन्याच्या झाडूने स्वच्छ करण्याचा विधी त्यांच्या हस्ते झाला. यात्रेतील परंपरागत विधींना सुरुवात होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंदिरात मंगल आरती केली. दरम्यान, गुजरातमध्ये मंगळवारी भगवान जगन्नाथाच्या रथयात्रे दरम्यान, येथील यात्रा मार्गावरील दरियापूर येथे एका इमारतीची बाल्कनी कोसळल्याने दुर्घटना घडली. यामध्ये ११ जण जखमी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT