reshan card 
देश

Ration Card: रेशन कार्डसंबंधी सर्व समस्या सोडवा; टोल-फ्री क्रमांकावर फक्त एक कॉल करा

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- रेशन कार्ड गरिबांसाठी (Ration Card) एक महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहे. याच्या माध्यमातून सरकारी वितरण प्रणालीच्या दुकानातून अगदी कमी दरात गहु, तांदूळ इत्यादी धान्य बाजारातील दरांपेक्षा कमी किंमतीत खरेदी केले जाते. पण, गेल्या काही दिवसांपासून धान्य वितरणासंबंधी अनेक तक्रारी येत आहेत. अनेकदा पाहायला मिळालंय की, रेशन डिलर कार्डधारकांना त्यांच्या कोट्याचे धान्य देत नाहीयेत. जर तुम्हालाही अशाच प्रकारच्या अचडणीला सामोरे जावे लागत आहे तर तुम्ही टोल-फ्री क्रमांकावर फोन करुन तक्रार करु शकता. 

तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही NFSA च्या वेबसाईटवर जाऊ शकता. नॅशनल फूड सेक्युरिटी पोर्टलवर (NFSA) प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळे टोल-फ्री क्रमांक दिले आहेत. तुम्ही एनएफएसए (NFSA)च्या  https://nfsa.gov.in वेबसाईटला भेट देऊ शकता. या वेबसाईटवर मेल करुन किंवा फोन क्रमांकाच्या माध्यमातून तुम्ही तक्रार दाखल करु शकता. प्रत्येक राज्यासाठी टोल-फ्री क्रमांक देण्यात आला आहे. प्रत्येक राज्यामध्ये रेशन कार्ड बनवण्याची पद्धतही वेगवेगळी आहे. 

सरकारने भ्रष्ट्राचार कमी करण्यासाठी आणि प्रत्येक गरिबांपर्यंत धान्याचा पुरवढा योग्यरितेने व्हावा यासाठी हेप्ललाईन क्रमांक जारी केली आहे. त्यामुळे गरिबांपर्यंत रेशन पोहोचण्याची आशा आहे. रेशन डिलर अनेकदा कार्डधारकांना कमी धान्य देतात. अशाप्रकारच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. याला आळा घालण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. जर कोणत्या कार्डधारकाला त्याला निर्धारित धान्य मिळत नाही, तर तो टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांकावर आपली तक्रार नोंदवू शकतात. यामुळे रेशन डिलरच्या मनमानी कारभाराला आळा बसण्याची शक्यता आहे. 

प्रत्येक राज्यातील टोल-फ्री क्रमांक

महाराष्ट्र- 1800-22-4950
केरल- 1800-425-1550
तमिलनाडू - 1800-425-5901
तेलंगाना - 1800-4250-0333
त्रिपुरा- 1800-345-3665
आंध्रप्रदेश - 1800-425-2977
अरुणाचल प्रदेश - 03602244290
उत्तरप्रदेश- 1800-180-0150
उत्तराखंड - 1800-180-2000, 1800-180-4188
पश्चिम बंगाल - 1800-345-5505
दिल्ली - 1800-110-841
जम्मू - 1800-180-7106
काश्मीर - 1800-180-7011
आसाम - 1800-345-3611
बिहार- 1800-3456-194
छ्त्तीसगढ- 1800-233-3663
गोवा- 1800-233-0022
गुजरात- 1800-233-5500
हरियाणा - 1800-180-2087
हिमाचल प्रदेश - 1800-180-8026
झारखंड - 1800-345-6598, 1800-212-5512
कर्नाटक- 1800-425-9339
अंदमान आणि निकोबार बेटे - 1800-343-3197
चंदीगढ - 1800-180-2068
दादरा और नगर हवेली आणि दमन-दीव - 1800-233-4004
लक्षद्वीप - 1800-425-3186
पुदुच्चेरी - 1800-425-1082
मणिपुर- 1800-345-3821
मेघालय- 1800-345-3670
मिजोरम- 1860-222-222-789, 1800-345-3891
नागालँड- 1800-345-3704, 1800-345-3705
ओड़िसा - 1800-345-6724 / 6760
पंजाब - 1800-3006-1313
राजस्थान - 1800-180-6127
सिक्किम - 1800-345-3236


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT