RBI Bank esakal
देश

RBI: भारताच्या परकीय चलनसाठ्यात मोठी वाढ; अर्थव्यवस्था जागतिक उलथापालथींना तोंड देण्यास सक्षम!

RBI: यापूर्वी भारताचा परकीय चलनसाठा यावर्षी ११ ऑगस्ट रोजी ६०० अब्ज डॉलरवर गेला होता. एक डिसेंबर रोजी आता हा साठा ६०४ अब्ज डॉलरवर गेला आहे. त्यामुळे आपल्या आयातीचा खर्च आपण सुरळीतपणे भागवू शकतो

सकाळ डिजिटल टीम

चार महिन्यानंतर प्रथमच भारताचा परकीय चलनसाठा एक डिसेंबर रोजी ६०० अब्ज डॉलरवर गेला आहे. मागील आठवड्यात म्हणजे २४ नोव्हेंबर रोजी आपला परकीय चलनसाठा ५९७.९३ अब्ज डॉलर होता.

यापूर्वी भारताचा परकीय चलनसाठा यावर्षी ११ ऑगस्ट रोजी ६०० अब्ज डॉलरवर गेला होता. एक डिसेंबर रोजी आता हा साठा ६०४ अब्ज डॉलरवर गेला आहे. त्यामुळे आपल्या आयातीचा खर्च आपण सुरळीतपणे भागवू शकतो, असा विश्वास असल्याचे रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी द्वैमासिक पतधोरणाची माहिती देताना सांगितले.

यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्ये भारताचा परकीय चलनसाठा सर्वकालिक उच्चांकावर म्हणजे ६४२ अब्ज अमेरिकी डॉलरवर गेला होता. त्यानंतर गेला वर्षभर रुपया घसरत चालल्यामुळे त्याची घसरण थोपवण्यासाठी रिझर्व बँकेने बाजारात अमेरिकी डॉलर विकल्याने हा साठा घसरला होता. तरीदेखील या वर्षात आपल्याप्रमाणे वाढत्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या तुलनेत भारतीय रुपयाने कमी चढउतार दाखवले आहेत असेही ते म्हणाले.

रुपया त्यातुलनेत स्थिर राहिल्याने देशाची सूक्ष्म आर्थिकअवस्था चांगली असल्याचेच दिसून येते. यापुढेही जागतिक आर्थिक उलथापालथी झाल्या तरी त्याला तोंड देण्याची भारतीय अर्थव्यवस्थेची क्षमताही त्यातून दिसते, असेही ते म्हणाले. 

चीन, रशिया, मलेशिया, तुर्कस्थान, व्हिएटनाम, दक्षिण आफ्रिका, थायलँड आदी देशांच्या तुलनेत भारतीय रुपयाचा डॉलरशी असलेला विनिमय दर ०.६६ असा सर्वात कमी असल्याचेही दास यांनी दाखवून दिले. गेली दोन वर्षे परकीय वित्तसंस्था आपला निधी भारतातून परत नेत होत्या. मात्र या वर्षात त्यांनी सहा डिसेंबरपर्यंत २४.९ अब्ज अमेरिकी डॉलर भारतात आणल्याचेही ते म्हणाले.

तर मागीलवर्षी भारतात २०.८ अब्ज अमेरिकी डॉलर ची थेट परकीय गुंतवणूक झाली होती. यावर्षी एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान देशात १०.४ अब्ज अमेरिकी डॉलर एवढी थेट परकीय गुंतवणूक झाल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT