RBI Penalty on Banks : भारतीय रिझर्व्ह बँकेने अनेक बँकांवर नियमांचे पालन न केल्याप्रकरणी 8 सहकारी बँकांना 12.75 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या सहकारी बँकांमध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मणिपूर, गुजरात, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील बँकांचा समावेश आहे. (RBI Imposes Penalty On 8 Co-operative Banks)
मध्यवर्ती बँकेने मणिपूर महिला सहकारी बँक लिमिटेड (मणिपूर), युनायटेड इंडिया सहकारी बँक लिमिटेड (यूपी), जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक (नरसिंगपूर), अमरावती मर्चंट सहकारी बँक लिमिटेड (अमरावती), फैज मर्कंटाइल सहकारी बँक लिमिटेड (नाशिक) आणि नवनिर्माण सहकारी बँक लि. (अहमदाबाद) या बँकांना दंड ठोठावला आहे.
या सहकारी बँकांवर विविध प्रकारच्या आर्थिक अनियमितता दिसल्याने आरबीआयने ताशेरे ओढले आहेत. डिपॉझिटर एज्युकेशन अॅण्ड अवेअरनेस फंडमध्ये दावा न केलेल्या ठेवी जमा न करणे, बँक घोटाळ्यांचा उशिरा अहवाल देणे आणि असुरक्षित कर्जे वितरित करणे या कारणांमुळे काही बँकांना दंड ठोठावण्यात आला.याआधी RBI ने लखनऊ येथील इंडियन मर्केंटाइल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर एक लाख रुपये काढण्याच्या मर्यादेसह अनेक निर्बंध लादले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.