High Court esakal
देश

Judge : यंदा सर्वाधिक 138 न्यायाधीशांची नियुक्ती, 2016 चा विक्रम मोडला

देशातील न्यायालयांमध्ये या वर्षात आतापर्यंत विक्रमी संख्येनं न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आलीय.

सकाळ डिजिटल टीम

देशातील न्यायालयांमध्ये या वर्षात आतापर्यंत विक्रमी संख्येनं न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आलीय.

नवी दिल्ली : देशातील न्यायालयांमध्ये या वर्षात आतापर्यंत विक्रमी संख्येनं न्यायाधीशांची (Judge) नियुक्ती करण्यात आलीय. 14 ऑगस्ट रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात 11 न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळं यावर्षी आतापर्यंत विक्रमी 138 न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आलीय. 2016 मध्ये उच्च न्यायालयात (High Court) 126 न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली होती.

सोमवारी कायदा आणि न्याय मंत्रालयानं (Ministry of law and Justice India) एक निवेदन जारी केलं की, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात (Haryana High Court) 11 न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या अधिसूचनेसह यावर्षी सरकारनं विविध न्यायालयांमध्ये 138 न्यायाधीशांची नियुक्ती केली, जी 2016 पेक्षा वाढली आहे. तसंच 126 न्यायाधीशांच्या नियुक्तीचा विक्रमही मागं टाकला आहे.

यापूर्वी 2021 मध्ये उच्च न्यायालयात 120 न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली होती, तर सर्वोच्च न्यायालयात 11 न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली होती. न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया वेगवान करण्यात आल्याचं कायदा मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय. 13 ऑगस्ट रोजी कायदा मंत्रालयानं अलाहाबाद उच्च न्यायालय, आंध्र प्रदेश उच्च न्यायालय, तेलंगणा उच्च न्यायालय, गुवाहाटी उच्च न्यायालय, ओडिशा उच्च न्यायालय, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयात 26 न्यायाधीशांची नियुक्ती केली होती. रविवारी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात 11 न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Interview : ‘लाडकी बहीण’च्या यशामुळे ‘पंचसूत्री’चा घाट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणूक काळात राज्य शासनाचा मोठा निर्णय, राज्यातील 'या' शाळा आजपासून सहा दिवस राहणार बंद

Prataprao Pawar : ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने प्रतापराव पवार यांचा लंडनमध्ये सन्मान

Kartik Purnima 2024 Wishes: आज कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीनिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?

SCROLL FOR NEXT