नवी दिल्ली - देशातंर्गत विमान कंपन्यांतर्फे होणाऱ्या प्रवासी वाहतुकीमध्ये ४२.८५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षभरात प्रवासी संख्या वृद्धीचा मासिक दर २२.१८ टक्के राहिला असून विमान उड्डाणे रद्द होण्याचे प्रमाण अर्धा टक्क्यांपेक्षा कमी राहिले आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयातर्फे आज ही माहिती जारी करण्यात आली.
विमान कंपन्यातर्फे सादर करण्यात आलेल्या वाहतूक तपशीलानुसार देशांतर्गत प्रवासी संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली असून नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात ५.०३ कोटी जणांनी विमानाद्वारे प्रवास केला. तर मागील आर्थिक वर्षामध्ये विमान प्रवाशांची संख्या ३.५२ कोटी होती. त्यातुलनेत प्रवासी संख्येमध्ये झालेली वार्षिक वृद्धी ४२.८५ टक्क्यांची असून देशांतर्गत विमान सेवांची वाढलेली मागणी, विमान वाहतूक क्षेत्रामध्ये असलेल्या संधी आणि प्रगतीचे हे निदर्शक असल्याचे विमान वाहतूक मंत्रालयाचे म्हणणे आहे.
एप्रिल २०२२ ते एप्रिल २०२३ या दरम्यान प्रवासी संख्येमध्ये वृद्धीचा मासिक दर २२.१८ टक्के असा उल्लेखनिय राहिला. एवढेच नव्हे तर एप्रिल महिन्यात नियोजित देशांतर्गत उड्डाणे रद्द होण्याचे प्रमाण देखील ०.४७ टक्के म्हणजे अर्ध्या टक्क्याहून कमी होते, सोबतच, प्रवाशांच्या तक्रारींचे प्रमाणही नगण्य होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.