Rainy Session Sakal
देश

खासगी रुग्णालयांचा लशींचा कोटा घटविणार

लसीकरणाची सारी सूत्रे केंद्र सरकारने जूनमध्ये हाती घेत राज्यांना मोफत लस देण्याचे धोरण जाहीर केले होते.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - ‘कोरोना लसीकरणाच्या (Corona Vaccination) नवीन धोरणानुसार केंद्र सरकारतर्फे (Central Government) खासगी रुग्णालयांना (Private Hospital) २५ टक्के लशींचे डोस (Dose) मोफत देण्याचे धोरण अमलात आणण्यात आले आहे पण या रुग्णालयांचा लसीकरणाचा वेग अत्यंत कमी असल्याचे दिसून आल्याने हा कोटा घटविण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे.’ अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी आज राज्यसभेत बोलताना दिली.

लसीकरणाची सारी सूत्रे केंद्र सरकारने जूनमध्ये हाती घेत राज्यांना मोफत लस देण्याचे धोरण जाहीर केले होते. २१ जूनपासून राज्य सरकारांना एकूण उत्पादनाच्या ७५ टक्के व खासगी रुग्णालयांना २५ टक्के लस देण्याचे धोरण अमलात आणण्यात आले होते. खासगी रुग्णालयांना लशीसाठी किती रक्कम आकारावी हेही सरकारने निश्चित ठरवून दिले. मात्र २१ जूननंतर देशाच्या अनेक राज्यांना तीव्र लस टंचाई जाणवू लागली होती.

केंद्राने लस वाटपात आखडता हात घेतल्याने महाराष्ट्र, दिल्ली, केरळ यासह अनेक राज्यांतील लसीकरणाला याचा फटका बसला होता. भाजप खासदार सुशीलकुमार मोदी यांनी आज खासगी रुग्णालये केंद्राकडून मिळालेल्या लशी अपेक्षेनुसार वापरत नसतील तर त्यांचा कोटा रद्द करणार का? असा प्रश्न विचारला होता.

कमी वेगाने अडचण

आरोग्यमंत्री मंडाविया म्हणाले, ‘खासगी रुग्णालयांचा लसीकरणाचा अल्प वेग पाहता या रुग्णालयांनी वापरात न आणलेल्या ७ ते ९ टक्के लशी सरकारी लसीकरण केंद्रांना देण्यास सुरवात करण्यात आली. खासगी रुग्णालयांनी लसीकरणाचा वेग वाढविला नाही तर त्यांच्या राखीव २५ टक्के कोटा रद्द करण्याचाही विचार सरकार करू शकते.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : प्रियांका गांधी यांची आज 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा; कोल्हापुरातील गांधी मैदानात आयोजन

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT