ChatGPT esakal
देश

कंपन्या ChatGPTच्या प्रेमात! 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना देणार चॅट जीपीटीचं मोफत सब्सक्रिप्शन

संतोष कानडे

बंगळूरूः AI बेस ChatGPT आणि Bing Chat मुळे सध्या जगभर चिंता पसरली आहे. कारण एआयमुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येऊ शकतं, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मात्र काही कंपन्या स्मार्ट वर्क करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत. बंगळूरु येथील एक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना चॅट जीपीटीचं पेड सब्सस्क्रिप्शन देणार आहे. कंपनीने तसा निर्णय जाहीर केला आहे.

हेही वाचाः जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

बंगळूरु येथील इन्व्हेस्टिंग फर्म असलेल्या Capitalmindचे मुख्य कार्यकारी अधिकारी वशिष्ठ अय्यर यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, चॅट जीपीटीमुळेकर्मचाऱ्यांची प्रॉडक्टिव्हिट पाच पट वाढवण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे कंपनीने Chat GPT Plus सब्सक्रिप्शनचे पैसे कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. हे सब्सक्रिप्शन दोन हजार रुपये इतकं आहे.

अय्यर यांनी एक ट्विट करुन हेही सांगितलं की, चॅट जीपीटीसारखे 'एआय चॅटबॉट्स'मुळे प्रोग्रेसिव्ह फर्म्समध्ये ज्युनियर अॅनालिस्ट बेस जॉब धोक्यात येतील. त्यांचं म्हणणं आहे की, नवीन कर्मचाऱ्यांना एआयचा फायदा घेणं शिकावं लागेल. येणाऱ्या दिवसांमध्ये सरासरी काम करणाऱ्यांना जागा नसेल.

Google Assistant आणि Apple Siri हे AI बेस्ड व्हर्च्युअल असिस्टंट पूर्वीपासूनच युजर्ससाठी आहेत. परंतु ChatGPT आणि Bing Chat सारखे चॅटबॉट्स मानवी भाषांमध्ये उत्तरं देत आहेत. अॅपल एआयने नुकतंच GPT-4 लाँच केलं आहे. हे एक फास्ट आणि फरफेक्ट लँग्वेज मॉडल आहे. विशेष म्हणजे हे चॅटबॉट व्हिज्युअल माध्यमालाही रीड करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शिवसेना उबाठा गटाचे बाळा नर विजयी

Ambernath Assembly Election 2024 Result Live: अंबरनाथमध्ये बालाजी किणीकरांचा विजयी चौकार; शिवसेनेचे राजेश वानखेडे चितपट

SCROLL FOR NEXT