Campa Cola Sakal
देश

Campa Cola: कॅम्पा कोलासाठी मुकेश अंबानी करणार मुथय्या मुरलीधरनसोबत पार्टनरशीप; काय आहे करार?

कॅम्पा कोलाचा देशभरात प्रसार करण्यासाठी रिलायन्स विविध कंपन्यांसोबत पार्टनरशीप करत आहे.

राहुल शेळके

Mukesh Ambani Joins Hands With Muttiah Muralitharan: कॅम्पा कोलाचा देशभरात प्रसार करण्यासाठी रिलायन्स विविध कंपन्यांसोबत भागीदारी करत आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेलने श्रीलंकन ​​कंपनीसोबत अशीच धोरणात्मक भागीदारी केली आहे.

ही कंपनी जगातील दिग्गज फिरकीपटू आणि श्रीलंकेचा माजी खेळाडू मुथय्या मुरलीधरन यांची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिलोन बेव्हरेज इंटरनॅशनल भारतातील कॅम्पासाठी कॅनचे पॅकिंग करणार आहे.

याशिवाय दोन्ही कंपन्यांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करण्याबाबतची चर्चा झाली आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सला भारतातील सिलोन बेव्हरेजेस इंटरनॅशनलच्या काही ब्रँडचे वितरण हक्क मिळण्याची शक्यता आहे. अशी माहिती livemint या वेब साईटने दिली आहे.

रिलायन्सने कोणता करार केला आहे?

कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, सिलोन बेव्हरेजेस प्लांटची प्रतिवर्षी 300 दशलक्ष पेय कॅन भरण्याची क्षमता आहे आणि आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक कंपन्यांसोबत भागीदारी आहे.

तज्ञांच्या मते, रिलायन्स सध्या श्रीलंकेतून कॅम्पा कॅन आयात करत असताना, सिलोन बेव्हरेजेस इंटरनॅशनलने भारतात रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्साठी उत्पादन युनिट स्थापन करण्याची योजना आखली आहे.

याशिवाय, भागीदारीचा भाग म्हणून रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्ला भारतातील सिलोन बेव्हरेजेसच्या काही ब्रँड्सचे वितरण अधिकार मिळू शकतात. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि सिलोन बेव्हरेज इंटरनॅशनलकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. भारतातील कॅनसाठी कॅम्पाची ही पहिलीच भागीदारी आहे.

रिलायन्सला कसा फायदा होईल?

सिलोन बेव्हरेजेसची स्थापना 2020 मध्ये एक पेय प्रक्रिया आणि फिलिंग कंपनी म्हणून करण्यात आली, जी श्रीलंकेतील तसेच जगभरातील शीतपेय कंपन्यांना कॅनचा पुरवठा करते.

वेबसाइटनुसार, तीची ज्या कंपन्यांशी भागीदारी आहे, त्यामध्ये मिनरल वॉटर, एनर्जी ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स, हॉट फिल ज्यूस आणि कॅनमधील फ्लेवर्ड दूध यांचा समावेश होतो.

ज्यात दर तासाला 48,000 कॅन आणि 34,000 बाटल्यांचे उत्पादन होते. रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची FMCG कंपनी लहान आणि मध्यम आकाराच्या वितरकांमध्ये झपाट्याने आपली पोहोच वाढवत आहे.

कोका-कोला आणि पेप्सिको यांना राष्ट्रीय स्तरावर तगडी स्पर्धा दिली जाऊ शकते. रिलायन्स रिटेलने गेल्या वर्षी प्युअर ड्रिंक्स ग्रुपकडून कॅम्पा 22 कोटी रुपयांना विकत घेतला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT