Reliance Jiobook  esakal
देश

Reliance Jiobook : अंबानींचं Jiobook चीनमध्ये बनतं, मग सरकारी आयात बंदीचा त्यांच्यावर काय होणार परिणाम

रिलायन्सने नुकतेच JioBook लाँच केले आहे

सकाळ डिजिटल टीम

Reliance Jiobook : रिलायन्सने नुकतेच JioBook लाँच केले आहे. जिओचा टॅग असलेला हा लॅपटॉप मेड-इन-इंडिया असल्याचं अनेकांना वाटतंय. जर तुम्हाला देखील असंच वाटत असेल तर थांबा. या लॅपटॉपची निर्मिती चीनमध्ये झाली आहे. ही गोष्ट ऐकून विचित्र वाटत असली तरी हे खरं आहे. याशिवाय, जिओबुकची विक्री रिलायन्स जिओच्या नव्हे तर रिलायन्स रिटेलद्वारे केली जात आहे. नेमकं प्रकरण काय आहे ते समजून घेऊ.

JioBook चं उत्पादन करणारी कंपनी Hunan Greatwall Computer System आहे, जी चीनमध्ये आहे. अर्थ स्पष्ट आहे की मुकेश अंबानी यांचं जिओबुक चीनमध्ये बनतंय, भारतात नाही. अमेझॉनच्या वेबसाइटवर जिओबुकचे नवीन मॉडेल शोधल्यास त्याच्या चिनी उत्पादकाचं नाव स्पष्टपणे दिसेल.

आयातबंदीनंतर अंबानींनाही तोटा सहन करावा लागला

आतापर्यंत बरेच लोक विचार करत आहेत की JioBook भारतात बनवले आहे आणि भारतात लॅपटॉप आयातीवर बंदी घातल्याने रिलायन्स रिटेलवर कोणताही परिणाम होणार नाही, ते चुकीचे आहेत. JioBook चे नाव देखील बंदी घालण्याच्या यादीत आहे कारण तो मेड-इन-चायना लॅपटॉप आहे. जिओबुकचे पहिल्या आणि दुसऱ्या जनरेशनचे दोन्ही मॉडेल्स केवळ चीनमध्ये बनवलेले आहेत.

भारतात लॅपटॉप आयात बंदी

3 ऑगस्ट रोजी भारत सरकारने लॅपटॉप, टॅब्लेट आणि सर्व-इन-वन लॅपटॉप आयातीवर काही निर्बंध लादले आहेत. आतापासून कंपन्यांना लॅपटॉप, पर्सनल कॉम्प्युटर आणि टॅबलेट यांसारखी उपकरणे आयात करण्यासाठी परवाना घ्यावा लागणार आहे. मेक इन इंडिया अंतर्गत भारतात अशा उत्पादनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

JioBook लॅपटॉप आता भारतात येणार नाहीत?

वर नमूद केल्याप्रमाणे, JioBook चीनमध्ये बनवले आहे आणि आता बाहेरून बनवलेले लॅपटॉप भारतात आणण्यासाठी कंपन्यांना सरकारची परवानगी घ्यावी लागेल. आता रिलायन्स रिटेल या परिस्थितीला कसे सामोरे जाईल, हे तूर्तास माहीत नाही.

Money9 चे संपादक अंशुमन तिवारी म्हणतात की, भारतात जिओबुकवर बंदी घालण्यास वाव नाही. त्याच वेळी, रिलायन्स व्यतिरिक्त, अनेक कंपन्या आहेत ज्या लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू परदेशी बाजारपेठेतून आयात करतात. अशा सर्वांची अवस्था आता सारखीच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT