'राज्यघटना लागू झाल्यापासूनच त्याविरुद्ध षड्यंत्र सुरू आहे. संविधानाला धोका निर्माण करणारी परिस्थिती कोणीही खपवून घेऊ नये.'
बंगळूर : राज्यघटनेची पायमल्ली करून काम करणाऱ्यांना सत्तेवरून हटवा, असे आवाहन मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी केले. शहरातील पॅलेस मैदानावर आयोजित ‘संविधान व राष्ट्रीय एकता परिषदे’त ते बोलत होते.
ते म्हणाले की, भारताचे संविधान (Indian Constitution) जगात सर्वोत्तम आहे. सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेसह सर्वसमावेशक सुधारणा आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून संविधान बनवले गेले आहे. त्यात समता, बंधुता आणि राष्ट्रवादाचा पुरस्कार केला आहे. मात्र संविधान विरोधकांनी विनाकारण अपशब्द पसरवले आहेत.
राज्यघटना लागू झाल्यापासूनच त्याविरुद्ध षड्यंत्र सुरू आहे. संविधानाला धोका निर्माण करणारी परिस्थिती कोणीही खपवून घेऊ नये. संविधानाच्या इच्छेचे पालन करणे हे प्रत्येक सरकारचे कर्तव्य आहे. संविधान बदलण्यासाठी आम्ही सत्तेत आलो, असे म्हणणाऱ्यांना त्यांची जागा दाखवावी.
मंत्री एच. सी. महादेवप्पा (H. C. Mahadevappa) म्हणाले की, २६ जानेवारीपासून सुरू झालेल्या संविधान जथ्याने राज्यातील ५,६०० हून अधिक पंचायतींचा प्रवास केला आहे. लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट मूकपटाला पारितोषिक देण्यात आले. तुमकूर, दावणगिरी, म्हैसूर, कोडगू, बेळ्ळारी यासह विविध जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट उपक्रमांसाठी रोख पारितोषिके देण्यात आली आणि संविधानाच्या प्रास्ताविकेच्या वाचनात सहभागी झालेल्या मुलांनाही बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती बसवराज यांनी बाहेर येऊन संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व्ही. गोपाल गौडा, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एच. एन. नागमोहन दास, मंत्री प्रियांक खर्गे, आमदार एस. टी. सोमशेखर, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव नसीर अहमद यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.