Republic Day 2023 esakal
देश

Republic Day 2023 : मृत्यूपश्चातही देशसेवा करणारे बाबा हरभजन सिंग; स्वप्नात येऊन सैनिकांना सांगतात चीनच्या कुरघोड्या!

वीरमरण आल्यावरही ते देशाची सेवा करत आहेत म्हणून हे मंदिर बांधण्यात आलं आहे

सकाळ डिजिटल टीम

आपल्या देशात अनेक देवी देवतांची मंदिरे आहेत. पण, कधी कुठल्या सैनिकाचे मंदिर असल्याचे तुम्ही ऐकलं आहे का? होय, आपल्या देशात असे एक मंदिर आहे जे भारतीय लष्करातील एक सैनिकाची आठवण म्हणून निर्माण केले आहे. हे मंदिर सैनिक बाबा हजभजन सिंग यांचे आहे. वीरमरण आल्यावरही ते देशाची सेवा करत आहेत म्हणून हे मंदिर बांधण्यात आलं आहे. देशाच्या उंच पर्वतरांगांमध्ये असलेल्या सिक्कीम राज्यात हे मंदिर आहे. चला तर मग जाणून घेऊयात यामागील खरी गोष्ट

हरभजन सिंग यांच्या जन्म 30 ऑगस्ट 1946 रोजी गुजरांवाला सध्याचे पाकव्याप्त पंजाबमधील सदराना या गावी झाला होता. गावातील शाळेत त्यांनी प्राथमिक तर 1995 मध्ये डी.ए.वि हायस्कूलमधून त्यांनी मॅट्रिक परीक्षा दिली. त्यांना लहानपानापासून लष्करात भरती होण्याची आवड होती. 1966 मध्ये ते भारतीय सभेत पंजाब रेजिमेंटमध्ये सैनिक म्हणून रुजू झाले.

सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांना सिंगल कोअरमध्ये घेण्यात आले. 30 जून 1965 मध्ये हरभजन सिंग यांना एका मिशनची जबाबदारी देण्यात आली. 1965 च्या युद्धात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांनंतर 1968 मध्ये त्यांची बदली सिक्कीममध्ये करण्यात आली.

एकेदिवशी हरभजन सिंग पूर्व सिक्कीममध्ये असलेल्या आपल्या छावणीसाठी काही समान घेऊन जात होते. खोल दरी असलेल्या रस्त्यावरून त्यांचा पाय घसरला आणि ते खाली असलेल्या नदीत 2 किलोमीटर वाहून गेले. याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी त्यांचा शोध घेतला पण त्यांना हरभजन सिंग यांच्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. 5 दिवस शोध घेऊन अखेर शोधकार्य थांबवण्यात आले.

त्या घटनेच्या पाचव्या दिवशी त्यांनी एका प्रीतम सिंग नावाच्या एका शिपायाच्या स्वप्नात येऊन त्यांचा मृतदेह कुठे आहे याबद्दल माहिती नाही. पण, अधिकाऱ्यांना ती गोष्ट पटली नाही. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण, जेव्हा हरभजन सिंग याचा काहीच शोध लागला नाही तेव्हा त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी शोध घेतला असता हरभजनसिंग यांचा मृतदेह सापडला. भारतीय सैन्यांने शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

त्यांनंतर काही दिवसांनी हरभजन सिंग यांनी पुन्हा एकदा मित्राच्या स्वप्नात येऊन माझी समाधी बांधावी अशी इच्छा व्यक्त केली. यानंतर सिक्कीममध्येच ‘छोका छो’ याठिकाणी त्यांची समाधी बांधण्यात आली. मृत झाले असले तरीही अजून हरभजन सिंग त्यांची ड्युटी करतात.

चीनमध्ये होत असलेल्या योजना, गुप्त बैठका यांची महिती ते भारतीय लष्कराला देत होते. आणि त्यावर अमलबजावणी केल्यास चीनचे अनेक हल्ले रोखण्यात यश आले होते. त्यांचे हे देशप्रेम पाहून भारतीय लष्कराने त्यांचे वेतन आणि 2 महिन्याची वार्षिक सुट्टी देऊ केली आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना कॅप्टन या उपाधीने सन्मानित करण्यात आले.

दोन महिन्याची सुट्टी मिळाल्यावर सैन्यातील इतर जवान हरभजन सिंग यांचे सामान रेल्वेत ठेवतात त्यांचे तिकीटही ठेवले जाते. रेल्वे त्यांच्या गावी पोहोचल्यावर स्थानिक लोक त्यांचे समान उतरून घेऊन त्याची मिरवणूक ही काढतात.

हरभजन सिंग यांच्या प्रति इतर सैनिकांच्या मनात आदर आणि प्रेम इतकं वाढलं आहे की, त्यांच्या मंदिरात त्याचे इतर सामान ठेवण्यात आले आहे. या सामानाच्या सुरक्षेसाठी 2 सैनिक तैनात असतात.तर त्यांचे बूट रोज धुवून स्वच्छ केले जातात. सैनिक सांगतात की, हरभजन सिंग यांच्या बुटाला रोज चिखल लागलेला असतो तर त्यांचे अंथरून ही रोज विस्कटलेले असते.

चिनी सैन्याचेही म्हणणे असेच आहे की, बाबा हरभजन सिंग त्यांना दिसतात. रात्रीच्या वेळी ते भारत चीन बॉर्डरवर घोड्यावरून गस्त घालतात. हरभजन सिंग यांच्या या देशभक्तीसाठी मृत्यु पश्चातही त्यांना देशसेवेत ठेवण्यात आले. एवढेच नाही तर त्यांचे एक मंदिरही बांधण्यात आले आहे. मंदिरात त्यांची एक सुरेख मूर्ती ठेवण्यात आली आहे.

केवळ सैनिकच नाहीत तर आजुबाजूच्या गावातील नागरिकही त्यांचे भक्त आहेत. त्यांच्या मूर्तीजवळ पाण्याच्या बाटल्या ठेवल्या जातात. ते पाणी चमत्कारिक असून त्याने अनेक रोगांचे निवारण होते अशी भाविकांची समजुत आहे. हरभजन सिंग यांच्या आयुष्यावर एक शॉर्ट फिल्मही बनवण्यात आलीय. ‘ प्लस मायनस’ असे त्याचे नाव असून भुवन बाम आणि भावना दत्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT