Republic Day 2023 Sakal
देश

Eknath Shinde: CM शिंदेंनी नवस केलेल्या कामाख्या देवीच्या रथानं वेधलं सर्वांचं लक्ष

देशभरात आज मोठ्या उत्साहात ७४ वा प्रजासत्ता दिन साजरा केला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

Republic Day 2023 : देशभरात आज मोठ्या उत्साहात ७४ वा प्रजासत्ता दिन साजरा केला जात आहे.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत दिल्लीतील कर्तव्य पथावर विविध कार्यक्रम सुरू आहेत. या ठिकाणी अनेक राज्यांच्या चित्ररथांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं. मात्र, सर्वाधिक चर्चा झाली ती आसामने सादर केकेल्या कामाख्य देवीच्या मंदिराच्या चित्ररथाची.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात बंडखोरी करून एकनाथ शिंदेंनी मविआ सरकार पाडलं. त्यानंतर शिंदेंसह सर्व आमदार आसाममध्ये गेले होते. त्यानंतर राज्यात घडत असलेल्या सत्तांतराच्या नाट्यात शिंदेंसह सर्व आमदारांनी गुवाहाटीतील कामाख्या देवीचं दर्शन घेत नवस केला होता.

त्यानंतर काही दिवसांपूर्वी राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर CM शिंदेंसह सर्व आमदार पुन्हा एकदा नवस फेडण्यासाठी गुवाहाटीतील कामाख्या देवीचं दर्शन घेतले होते.

CM शिंदेंच्या सत्तांतराची झाली आठवण

दरम्यान, राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर आज प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर सादर करण्यात आलेल्या चित्ररथांमध्ये आसाम राज्याने कामाख्य देवी मंदिराची प्रतिकृती असलेला चित्ररथ सादर करण्यात आला. हा रथ पाहताच सर्वांना काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात बंडखोरी करून अवघ्या देशाचं लक्ष वेधलेल्या CM शिंदेंसह सर्व आमदारांची आठवण झाली आणि पुन्हा एकदा सत्तांतर नाट्याची चर्चा सुरू झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Amit Shah : सोरेन सरकारची उलटगणती सुरू...अमित शहा : सोरेन सरकारने केंद्राचा निधी हडप केला

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Thane: पहिल्या मजल्यावरील घरात अचानक लागली आग अन्... वाचा पुढे काय झालं

Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

SCROLL FOR NEXT