Why was the Constitution implemented with a delay 
देश

Republic Day 2024: संविधान दोन महिने विलंबाने का लागू करण्यात आले? काय आहे इतिहास?

Republic Day 2024 Why was the Constitution implemented with a delay : २६ जानेवारी हा दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. भारत २६ जानेवारी, १९५० रोजी एक सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनला होता.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- २६ जानेवारी हा दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. भारत २६ जानेवारी, १९५० रोजी एक सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनला होता. या दिवशी देशाने संविधान लागू केले होते. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित दस्तावेज आहे. संविधानाचा स्वीकार करण्यासाठी २६ जानेवारी हा दिवस निवडण्यामागे एक खास कारण आहे.(Republic Day 2024 26 january 1950 Why was the Constitution implemented with a delay of two months What is history)

देशात पहिल्यांदा स्वातंत्र्य दिवस २६ जानेवारी १९३० रोजी साजरा करण्यात आला होता. त्यामुळेच २६ जानेवारी रोजीच संविधान लागू करण्यात आले होते. ३१ डिसेंबर १९२९ मध्ये काँग्रेसच्या लाहौरच्या अधिवेशनात जवाहरलाल नेहरु हे अध्यक्षपदावर होते. त्यांनी अधिवेशनात पूर्ण स्वराज्याचा प्रस्ताव समोर ठेवला होता. अधिवेशनात अशी मागणी करण्यात आली होती की, २६ जानेवारी १९३० रोजीपर्यंत ब्रिटिश सरकारने भारताला डोमिनियन स्टेटचा दर्जा दिला नाही तर भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा करण्यात येईल.

२६ जानेवारी १९३० मध्ये संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ मध्ये मिळाले असले तरी २६ जानेवारीविषयी एक ममत्व कायम राहिले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान निर्मितीसाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली. यात एकूण २२ समिती होत्या. मसुदा समिती सर्वात महत्त्वाची समिती होती. याचे काम संपूर्ण संविधान तयार करण्याचे होते.

मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इतर सदस्यांसोबत मिळून २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसांनी अथक प्रयत्नांनतर जगातील सर्वात मोठे संविधान तयार केली. आंबेडकरांनी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना २६ नोव्हेंबर १९४९ साली संविधान सूपूर्द केले. मात्र, संविधान लागू करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी घेण्यात आला.

२६ जानेवारी रोजी संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा देण्यात आली होती. हा एक ऐतिहासिक दिवस होता. या दिवसाचे महत्व कायम राखण्यासाठी संविधान दोन महिन्यांनी म्हणजे २६ जानेवारी १९५० साली लागू करण्यात आहे. १९५० पासून आतापर्यंत देशात प्रजासत्ताक दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT