Republic Day Parade 2024 : देशात आज ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथावर भारताच्या तिन्ही सैन्यदलांतर्फे शक्तिप्रदर्शन आणि पथसंचलन केले जाते.
हे पथसंचलन झाल्यानंतर देशातील विविध राज्यांच्या चित्ररथांचे पथसंचलन केले जाते. या चित्ररथांमधून प्रत्येक राज्याच्या परंपरेची, इतिहासाची झलक पहायला मिळते. चित्ररथांच्या संचलनानंतर तिन्ही सैन्य दलांमधील पुरूष आणि महिला तुकडीतर्फे विविध प्रात्याक्षिकांमधून शौर्य आणि त्यांच्या पराक्रमाचे प्रदर्शन दाखवले जााते.
नुकतेच दिल्लीतील कर्तव्य पथावर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ‘नारी शक्तीचे’ पराक्रम दाखवत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आहे. या २६५ महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मोटारसायकलवर उभे राहून शौर्य आणि चित्तथरारक पराक्रमाचे प्रदर्शन केले.
यावेळी महिला पोलीस कर्मचारी मोटारसायकलवर स्वार होऊन हातात रायफल्स, तलवार, कॅमेरा आणि लॅपटॉप हाताळताना दिसून आल्या. एकूणच या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी नारी शक्तीचे दर्शन त्यांच्या चित्तथरारक शैलींमधून घडवले आणि उपस्थितांची मने जिंकून घेतली. या संदर्भातील व्हिडिओ एएनआयने एक्सवर (ट्विटर) शेअर केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.