राहुल गांधी esakal
देश

Rahul Gandhi : महिलांना नोकऱ्यांत आरक्षण; राहुल गांधी यांचे आश्‍वासन

‘आधी आबादी, पूरा हक’ची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ‘‘शक्तीशाली महिलांमध्ये देशाचे भवितव्य बदलण्याची ताकद आहे. त्यामुळे सत्तेत आल्यास काँग्रेस सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देईल,’’ असे आश्‍वासन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज दिले.

राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत महिलांना कमी संधी उपलब्ध असल्याबद्दल अनेक प्रश्‍न उपस्थित केले. ते म्हणाले,‘‘देशात अजूनही तीन पैकी फक्त एकाच महिलेला रोजगार का आहे? सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण फक्त दहाच टक्के कसे काय? भारताच्या एकूण लोकसंख्येत निम्म्या महिला असतील तर उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षणात त्यांचे प्रमाण ५० टक्के का नाही? यंत्रणेमध्येही त्यांचे प्रमाण कमी कसे?’’ सरकारमध्ये महिलांना योगदान देण्याची समान संधी दिली तरच त्यांच्या क्षमतेचा पूर्ण उपयोग होईल, असे म्हणत राहुल यांनी ‘आधी आबादी पुरा हक’ असा नारा दिला आणि त्यामुळेच काँग्रेस सत्तेत आल्यास सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ५० टक्के जागा राखीव ठेवल्या जातील, असेही राहुल यांनी जाहीर केले.

काँग्रेसने ‘नारी न्याय’ अंतर्गत महिलांना पाच गॅरंटी काही दिवसांपूर्वी जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, केंद्रात काँग्रेस सत्तेत आल्यास देशातील गरीब घरांमध्ये एका महिलेला प्रत्येक वर्षी एक लाख रुपये दिले जातील. महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षण; आशा तसेच अंगणवाडी सेविका आणि माध्यान्ह भोजन योजनेतील कर्मचाऱ्यांचे मानधन दुप्पट केले जाईल, अशी आश्‍वासनेही काँग्रेसने पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये दिली आहेत.

तर समाज शक्तीशाली बनेल

संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली. राहुल म्हणाले,‘‘महिलांना निश्‍चित उत्पन्न, सुरक्षित भविष्य, स्थैर्य आणि आत्मसन्मान मिळाल्यास समाज शक्तीशाली बनेल. सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ५० टक्के जागांवर संधी मिळाल्यास देशातील प्रत्येक महिलेच्या मनात विश्‍वास निर्माण होईल आणि ही महिलाशक्ती देशांचे भवितव्य बदलेल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

SCROLL FOR NEXT