नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवरची बंधने पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहेत. यामुळे, परदेशात जाऊ पाहणाऱ्यांचं स्वप्न सध्यातरी अधुरंच राहणार आहे. कारण कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर घातलेली बंदी 31 ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे. नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने (Directorate General of Civil Aviation - DGCA) आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी उड्डाणांवरील प्रतिबंध पुन्हा एकदा एका महिन्यासाठी वाढवले आहेत. मात्र, काही मोजक्या मार्गांवरील काही आंतरराष्ट्रीय शेड्यूल्ड उड्डाणांना अपवादात्मक परिस्थितीत परवानगी दिली जाऊ शकते. कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे 23 मार्च 2020 रोजी भारतात शेड्यूल्ड आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे रद्दबातल ठरवण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने प्रत्येक महिन्याच्या अखेरिस यामध्ये एकेक महिन्याने वाढ करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे.
या नव्या आदेशात DGCA ने म्हटलंय की, 31 ऑगस्ट, 2021 च्या 23:59 वाजेपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील प्रतिबंध कायम राहतील.
गेल्या वर्षी 23 मार्च रोजी कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर लागू करण्यात आलेले निर्बंध आजही कायम आहेत. मात्र, प्रवाशांच्या अखंड वाहतुकीसाठी अनेक देशांशी द्विपक्षीय हवाई बबल करारानुसार भारताने विविध आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालविली आहेत. भारताने अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमीरात, केनिया, भूटान आणि फ्रान्स सहित 27 देशांसोबत एअर बबल करार केला आहे. दोन देशांच्या दरम्यान एअर बबल पॅक्ट अंतर्गत त्यांच्या विमान कंपन्या त्यांच्या प्रदेशांदरम्यान विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.