Retired soldier kills 5 members of family including a 6 month old in haryana Crime News  
देश

माजी सैनिकाने ६ महिन्यांच्या चिमुरड्यासह कुंटुंबातील ५ जणांना संपवलं; धक्कादायक कारण आलं समोर

Retired soldier kills 5 members of family : अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भूषण कुमार असे आरोपीचे नाव असून त्याने रात्री उशीरा पहिल्यांदा धारधार शस्त्राने भावावर हल्ला केला.

रोहित कणसे

एका माजी सैनिकाने आपल्याच कुटुंबातील पाच जणांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हरियाणाच्या अंबाला येथे ही घटना घडली असून मृतांमध्ये दोन मुलांचा देखील समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री घडली, मृतांची ओळख पटली असून यामध्ये ६५ वर्षीय आई सरोपी देवी, ३५ वर्षीय भाऊ हरीश कुमार, हरीश यांची पत्नी सोनिया(३२ वर्ष), मुलगी यशिका (५ वर्ष) आणि ६ महिन्यांचा मुलगा मयंक याचा समावेश आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भूषण कुमार असे आरोपीचे नाव असून त्याने रात्री उशीरा पहिल्यांदा धारधार शस्त्राने भावावर हल्ला केला. त्यानंतर एक-एक करून संपूर्ण कुटुंबाला संपवले. इतकेच नाही तर या सर्वांचे मृतदेह जाळून टाकण्याच देखील प्रयत्न केला. भूषणने त्याचे वडिल आणि भावाच्या मुलीवर देखील हल्ला केला होता. त्यांना देखील गंभीर इजा झाली आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिकदृष्ट्या दोन भावांमध्ये जमीनीवरून वाद झाला होता. नारायणगढ येथील रातौरमध्ये त्यांची जमीन होती, ज्यावर दोघे भाऊ दावा सांगत होते. पोलिसांनी सांगितले की, घटनेनंतर ताबडतोब पोलीस घटनास्थळी पोहचले. या घटनेच्या सखोल तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. आरोपी भूषण कुमार सध्या फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेणे सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Latest Maharashtra News Updates live : महाराष्ट्रात चोरांचे सरकार,मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT