Rising heat Indians lives in danger World Bank report 2065 heat waves will increase 25 times sakal
देश

Heat wave : वाढती उष्णता भारतीयांचे जीवन संकटात टाकणारी

जागतिक बँकेचा अहवाल; २०६५ पर्यंत उष्णतेच्या झळा २५ पटीने वाढतील

सकाळ वृत्तसेवा

तिरुअनंतपुरम : गेल्या काही दशकांत भारतात झालेल्या हजारो मृत्युमागे वाढती उष्णता कारणीभूत असून त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काळात जगात सर्वाधिक उष्ण वातावरण असलेल्या ठिकाणांपैकी भारत हे ठिकाण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ही स्थिती मानवी जीवनाला संकटात टाकणारी आहे, असे जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे.

जागतिक बँक आणि केरळ सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय ‘इंडिया क्लायमेट ॲड डेव्हलपमेंट पार्टनर्स मीट’चे आयोजन केलेले असताना अहवाल मांडण्यात आला. जागतिक बँकेच्या क्लायमेट इन्वेस्टमेंट ऑपच्यूर्टिनिझ इन इंडियाज कुलिंग सेक्टर’ अहवालात म्हटले, की एप्रिल २०२२ मध्ये भारतीयांनी सर्वाधिक उष्णतेचा अनुभव घेतला आणि तो बराच काळ होता.

यंदा वसंत ऋतूच्या सुरवातीला उष्णतेच्या झळा बसल्याने वातावरण बदलाचा अनुभव घेता आला नाही. कारण या काळात राजधानी दिल्लीतील तापमान ४६ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदले गेले होते. मार्च महिन्यांत तापमानात असामान्यपणे वाढ झाली आणि आतापर्यंतचे सर्वात उष्ण काळ म्हणून त्याची नोंद झाली. आगामी काळात भारतातील वाढते उष्ण तापमान हे मानवी जीवनावर विपरीत परिणाम करणारे ठरू शकते, असे भाकीत अहवालात करण्यात आले आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये हवामान बदलासंदर्भात इंटर गर्व्हन्मेंट पॅनल ऑफ क्लायमेट चेंज (आयपीसीसी) च्या सहाव्या अहवालात देखील भारतीय उपखंड हा आगामी दशकांत अधिक उष्ण झळांचा सामना करेल, असा इशारा दिला होता. २०२१ मध्ये ‘जी-२० क्लायमेट रिस्क ॲटलस’ने दिलेल्या इशाऱ्यानुसार कार्बन उर्त्सजनाचे प्रमाण अधिक राहिल्यास २०३६-६५ पर्यंत भारतात उष्णतेच्या झळा या २५ पटीने वाढण्याची शक्यता राहू शकते.

आठ टक्के भारतीयांकडे एसी

एका अभ्यासानुसार आठ टक्के भारतीयांकडे वातानुकूलित यंत्रणा (एसी) आहे. एका वातानुकूलित यंत्रणेचा सरासरी खर्च हा २६० ते ५०० डॉलरच्या आसपास आहे. त्यामुळे ही यंत्रणा ठराविक लोकांसाठीची सुविधा आहे. तसेच उष्ण वातावरण थंड करून राहणे हे केवळ आरामदायी नसून जीवन आणि मृत्यू यांच्यातील अनिश्‍चित रेषा ठरू शकते, असे या अहवालात म्हटले आहे.

उत्पादन क्षमतेवर परिणाम

वाढत्या उष्णतेमुळे देशाच्या आर्थिक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा इशारा अहवालात देण्यात आला. देशातील ७५ टक्के मनुष्यबळ किंवा ३८० दशलक्ष नागरिक उष्णतेच्या वातावरणात काम करतात. काही वेळा सामान्यांपेक्षा अधिक उष्णतेतही जीव जोखमीत टाकून काम करतात. वाढत्या तापमानामुळे उत्पादकतेवर होणारा संभाव्य परिणाम पाहता २०३० पर्यंत जगभरात ८ कोटी लोकांना रोजगार गमवावा लागेल आणि त्यात भारतातील ३.४ कोटी नोकरदारांचा समावेश असेल. दक्षिण आशियायी देशातील मनुष्यबळावर उष्णतेचे तीव्र परिणाम होत असल्याचे भारताने म्हटले असून त्यामुळे एका वर्षात १०१ अब्ज तास वाया गेल्याचे नमूद केले आहे. ग्लोबल मॅनेजमेंट कन्सल्टिंग कंपनी मॅकिन्से ॲड कंपनीच्या विश्‍लेषणात म्हटले, की वाढत्या तापमानामुळे वाया जाणाऱ्या श्रमशक्तीमुळे भारताला या दशकाखेरपर्यंत जीडीपीतील ४.५ टक्के म्हणजे सुमारे १५० ते २५० अब्ज डॉलरवर पाणी सोडावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bishnoi community: "सलमान निर्दोष असता तर..."; सलीम खान यांच्या विधानामुळे बिश्नोई समाज संतप्त!

WI vs SL : ३ वर्षांनी आला, 'वेड्या'सारखा खेळला; संघाच्या १९५ धावांमध्ये एकट्याने कुटल्या नाबाद १०२ धावा

गोफण | येवल्याचे गगन तात्या नांदगावच्या कांदे मामांवर भारी

Nagpur Assembly Election : गिरीश पांडव, अनुजा केदार, सुरेश भोयर ठरले...दक्षिण नागपूरसह सावनेर, कामठीतील काँग्रेसचे उमेदवार जाहीर

सलमान- शाहरुख पेक्षाही श्रीमंत आहे बॉलिवूड मधील ही बेस्ट फ्रेंड जोडी आहे जास्त श्रीमंत ; संपत्ती ऐकून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT