Tejaswi Yadav Sakal
देश

Tejaswi Yadav ED Raid : छाप्याबद्दल विचारताच तेजस्वी यादव करू लागले म्याव-म्याव...

तेजस्वी यादव यांच्या या बोलण्यावर आजूबाजूला उभे असलेले आमदार आणि मंत्री हसायला लागले.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची ईडी चौकशी सुरू असल्याने त्यांचं कुटुंब सध्या ईडीच्या ताब्यात आहे. त्याच्या घरावर नुकत्याच झालेल्या छाप्याबद्दल माध्यमांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी अचानक म्याव म्याव करायला सुरुवात केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बिहार विधानसभेच्या परिसरामध्ये ईडीच्या छाप्याबद्दल माध्यमांनी त्यांना विचारलं. त्यावर उत्तर देताना त्यांनी माध्यमांनाच टोला लगावला आहे. तेजस्वी यादव म्हणाले, "आता छाप्यामध्ये हे मिळालं, ते मिळालं अशी बातमी चालवतील. सिंहासारखी गर्जना करतील आणि मग १० दिवसांनी म्याव म्याव करु लागतील."

तेजस्वी यादव यांच्या या बोलण्यावर आजूबाजूला उभे असलेले आमदार आणि मंत्री हसायला लागले. त्यानंतर त्यांनी भाजपवर निशाणा साधला आणि यावेळीही तपास यंत्रणेला छापेमारीत काहीही सापडले नाही. भाजप खुन्नसमध्येच छापे टाकत आहे पण आता त्यांनीच पराभव स्वीकारला आहे, असं यादव म्हणाले.

रेल्वेमध्ये नोकरी घोटाळ्यासाठी जमिनीच्या प्रकरणी ईडीने माजी मुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांची पाटणा येथे चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने पाटणा, दिल्ली आणि रांचीमध्ये जवळपास २४ ठिकाणी छापे टाकले. राबडी देवीची चौकशी आणि त्यांच्या घरावरील छापेमारीवरूनही विरोधक नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परप्रांतीयांच्या मतांचा गठ्ठा कुणाच्या पारड्यात? मतदारांना गोंजारण्यासाठी घेतल्या बैठका, कोण ठरणार वरचढ?

Accident : भरधाव इको कारची ट्रकला धडक, 6 जणांचा जागीच मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

Latest Marathi News Updates : वंचितचे उमेदवार अविनाश शिंदे यांच्या गाडीला अपघात

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्याआधी भारतीय संघातील सराव सामना का महत्त्वाचा? कोचनेच केला खुलासा

आधी मनसे आता भाजप? महायुतीला मत द्या म्हटल्याने सायली संजीव ट्रोल; नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला सुनावलं

SCROLL FOR NEXT