bjp leader Esakal
देश

Union Minister Resigns: भाजपला मोठा धक्का! माझ्यासोबत अन्याय झाला म्हणत केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा

Pashupati Kumar Paras resigns: भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी एकही जागा न दिल्याने नाराज असलेले आरएलजीपी प्रमुख पशुपती पारस यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी एकही जागा न दिल्याने नाराज असलेले आरएलजीपी प्रमुख पशुपती पारस यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पशुपती पारस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत राजीनामा दिल्याची माहिती दिली. (RLJP President Pashupati Kumar Paras resigns as Union Minister)

पशुपती पारस म्हणाले की, माझ्यासोबत आणि माझ्या पक्षासोबत अन्याय झाला आहे. आमच्या पक्षाला एकही जागा देण्यात आलेली नाही. पशुपती पारस हे राजीनामा देण्याआधी मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. बिहारमधील जागवाटपामध्ये भाजपने चिराग पासवान यांच्या एलजेपी (रामविलास) पक्षाला महत्त्व दिलं आहे. एलजेपीला पाच जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाराज असलेल्या पारस यांनी राजीनामा दिला आहे.

बिहारमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी एनडीएच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाला आहे.भाजप बिहारमध्ये १७ जागांवर लढणार आहे, तर नितीश कुमार यांची जेडीयू १६ जागांवर आपला उमेदवार देणार आहे. इतर घटक पक्ष जसे की दिवंगत रामविलास पासवान यांचे पुत्र आणि लोकजनशक्ती पार्टीचे (रामविलास) प्रमुख चिरास पासवान यांना पाच जागा देण्यात आल्या आहेत.

जीतनराम मांझी यांच्या पक्षाला (HAM) एक जागा, तर उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक जनता दलाला एक जागा देण्यात आली आहे. याआधी पशुपती पारस यांचा आरएलजेपी यांचा पक्ष एनडीएचा घटक पक्ष होता, पण त्यांना यावेळी एकही जागा देण्यात आलेली नाही. भाजपने निवडणुकीचे धोरण आखताना चिराग पासवान यांच्यावर जास्त विश्वास दाखवला आहे.

पशुपती पारस यांचे भाच्चे असलेले चिराग पासवान यांना भाजपकडून प्रोत्साहन मिळत होते. त्यामुळे पारस यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. भाजपने पशुपती पारस यांना टाळणे सुरु केले होते. जागावाटपाआधी त्यांच्यासोबत चर्चा देखील करण्यात आली नव्हती असं सांगितलं जातं. भाजपने त्यांना जवळ केलेले नसल्याने पशुपती पारस इंडिया आघाडीसोबत जाणार का असा प्रश्न पडत आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

Ease of Doing Business: जागतिक बँकेच्या 'ईझ ऑफ डुईंग बिझनेस' अहवालात भारताची मोठी झेप; जाणून घ्या काय आहेत कारण?

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

SCROLL FOR NEXT